पुणे विद्यापीठातील मुलींचं वसतिगृह की दारुचा अड्डा? एबीपी माझाच्या बातमीनंतर कारवाई, विद्यापीठ
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मद्य आणि सिगरेट पाकिटे आढळून आल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर आता विद्यापीठाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यापीठाने या प्रकरणात तीन विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. इतकचं नव्हे तर ज्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील खोल्यांमध्ये हे आढळून आले होते. त्या विद्यार्थिनींच्या पालक आणि विभाग प्रमुखांकडून यापुढे असे कृत्य होणार नाही याची लेखी हमी घेण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगरेट पाकिटे तसेच अमली पदार्थ मिळून आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीकडून करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
टेबलावर ओल्ड मंक, ड्रॉवरमध्ये सिगारेटची पाकिटं
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान करत आहेत. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वस्तीगृहातील मुलीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. वसतिगृहात राहात असलेल्या एका विद्यार्थिनीनेच या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे.
याच तरुणीने मद्यप्राशन आणि धुम्रपान करणाऱ्या वस्तीगृहातील मुलींवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये, असा आरोप केला होता. विशेष म्हणजे तक्रार करूनही वसतीगृहाच्या प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाहीये, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात होता. एबीपीने ही बातमी दाखवल्यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.