नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या आवळल्या, जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप

नागपूर हिंसा: राज्याच्या उपराजधानीत सोमवारी हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली. सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज नागपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. तर दुसरीकडे नागपूरचे पोलीस आयुक्त घटनास्थळावर दाखल होऊन  परिस्थितीचा आढावा घेत आहे.

अशातच नागपूरमधील हिंसाचारात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून (FIR) धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दंगलीचा मास्टरमाईंड असल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या फहीम खान नमाक व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहराध्यक्ष आहे. दरम्यान हा आरोपी पोलीस कोठडीत असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.  तर परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

नागपूर हिंसाचारातील म्होरक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

पुढे आलेल्या माहितीनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहराध्यक्ष आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधात त्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यावेळी त्याचा जामीन जप्त झाला होता. एबीपी माझाच्या हाती या एफआयआर बाबतची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. हिंसाचारातील मास्टर माईंडचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारणी फहीम खान नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्या आहेत.

नागपूरचे पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी परिसराची पाहणी

नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी आज चिटणवीस पार्क चौक, शिवाजी चौक या हिंसाचार ग्रस्त भागातील संचारबंदी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदोबस्तावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. परिस्थिती नियंत्रणात असून बंदोबस्त चोख असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी  घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता  कायम असल्याचे दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.