मोठी बातमी! कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे आज बाबासाहेब आगेंच्या घरी
Beed Babasaheb Aage Case: माजलगाव येथील भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्विकारली आहे. आगे यांच्या हत्येने (Beed Majalgaon Babasaheb Age Death) मन सुन्न झाले असून एक धडाडीचा कार्यकर्ता मी गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. तर भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही मंत्री पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) स्विकारली आहे.
अशातच, आज (19 एप्रिल) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बाबासाहेब आगे (Babasaheb Age) यांच्या कुटुंबियांची किट्टी आडगाव येथे भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे आज घाटशीळ पारगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर माजलगाव येथील भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुबियांची दुपारी 3 वाजताच्या सुमारास भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. याआधीच भाजपा कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची जवाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे.
मुख्यमंत्रीही आज बीडच्या दौऱ्यावर, पंकजा मुंडे, सुरेश धस एकाच व्यासपीठावर
बीडच्या शिरूर तालुक्यात गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हा नारळी सप्ताह होतोय. त्यामुळे आज (19 एप्रिल) पुन्हा मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच अध्यात्मिक व्यासपीठावर पाहायला मिळतील. शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा 93वा नारळी सप्ताह पार पडला. आज या सप्ताहाची सांगता होत असून काल्याच्या कीर्तनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपंकजा मुंडे उपस्थित असतील. साधारण साडेअकरा वाजता हे दोघेही हेलिकॉप्टरने घाटशीळ पारगाव येथे दाखल होतील. या निमित्य ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी इथे करण्यात आली आहे.
बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, माझे पतीच्या संशयी स्वभावातून हा प्रकार घडला
बीडच्या माजलगाव येथे दोन दिवसांपूर्वी बाबासाहेब आगे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. परंतु आता या खून प्रकरणातील आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने खरे कारण सांगितले असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचे व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता, यातूनच हा प्रकार घडला. असे सांगत बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते असे देखील या महिलेने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.