धक्कादायक! सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीमध्ये चक्क MD ड्रग्ज फॅक्टरी; 8 कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज (Drug) विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 8 कोटींचा MD ड्रग्ज जप्त केलं आहे. वसई कामन गाव परिसरात एमके ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणारी कंपनीमध्ये एमडी ड्रग्ज (Mumbai Drug Crime) बनवणारी फॅक्टरीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. वसईमध्ये सिमेंट बनवणारी कंपनीमध्ये एमडी ड्रग्ज बनवला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई चा बडगा उगारत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील ड्रग्जचे आणखीन एक कनेक्शन उघड झाले असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तीन आरोपींना अटक, मुख्य सूत्रधार फरार

पुढे आलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये चार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या चार किलो MD ड्रग्जचा बाजार भाव जवळपास 8 कोटी रुपये असल्याचं माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सादिक शेख, सिराज पंजवाणी आणि सय्यद इराणी असे आहेत. हे सराईत आरोपी असून या आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. साकीनाका परिसरात MD ड्रग विकणारा एका आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली होती, या आरोपीकडून ही वसईची फॅक्टरी बद्दल माहिती मिळाली होती. यामध्ये मुख्य आरोपी फरार असून त्याच्या शोध साकीनाका पोलिसांकडून घेतला जात आहे.

बार्शीतल्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती वाढली आरोपींची संख्या 12 वर

बार्शीतल्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती वाढताना पाहायला मिळतेय. या प्रकरणी आधीच 9 आरोपीचें नावे निष्पन्न असताना पोलिसांनी आणखी तिघांना आरोपी केलंय. यामध्ये परांडा येथील मस्तान शेखसह साजिद मुजावर आणि शेळके नावाच्या व्यक्तीला आरोपी म्हणून सहभागी करण्यात आलंय. मात्र हे तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. 18 एप्रिल रोजी बार्शीत 20 ग्राम एमडी ड्रग्ससह पोलीसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा भांडफोड पोलिसांनी केलाय.

आतापर्यंतची करवाई पाहता बार्शी ड्रग्ज तस्करीत एकूण 12 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील 9 आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा येथील तर तिघे बार्शी येथील आहेत. या 12 आरोपी पैकी 7 जण पोलिस कोठडीत असून तिघे फरार आहेत. परंडा येथील दीपक काळे आणि खांडवी येथील अय्याज शौकत शेख या 2 जणांना पोलिसांनी कालच अटक केली असून त्यांना आज 25 एप्रिल रोजी कोर्टात हजर केले जाऊ शकते.

हे आहेत बार्शी ड्रग्स प्रकरणातील आरोपी

परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर,हसन चाऊस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख आणि शेळके नावाच्या अश्या 9 जणांना आरोपी केली आहे त्यातील मुजावर, शेख व शेळके हे फरार आहेत. बार्शी येथील अय्याज शौकत शेख, जमीर अन्सार पटेल आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख हे 3 आरोपी बार्शी येथील आहेत. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती त्यानंतर तस्करीचा भांडाफोड झाला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.