युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा : संजय राऊत
पहलगम दहशतवादी हल्ल्यावरील संजय रौत मुंबई: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) बारा दिवस होऊन गेलेत. त्यात आमचे 27 लोक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मारले गेले. मात्र अद्याप बदला काय घेतला? रोज बातम्या येतात, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या 21 पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केले, पाकिस्तानच्या (Pakistan) हाय कमिशन मधला स्टाफ, कर्मचारीवर्ग कमी केला, याला बदला घेणं म्हणतात का? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता, त्यांचे पक्ष फोडता, त्यांना तुरूंगात टाकता, त्यांचे आयुष्य उध्वस्त करता. त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअर स्पेस बंद केले, याला बदला म्हणतात का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारला विचारला आहे. दहशतवादी हल्ल्यात 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा पाहिजे हे बघण्यासाठी इंदिरा गांधींचा इतिहास बघा. असा सल्लाही त्यांनी यावेळी देत भाजपवर टिकास्त्र डागले आहे.
भाजपकडून फक्त विरोधकांना चुन चुन कर मारण्याचा प्रयत्न
प्रधानमंत्री इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरत आहेत. मिठ्या मारत आहेत. लोकांना याला बदला घेणं म्हणत नाही. भीती वाटते मला या देशाची. आता अशा प्रकारचे राज्यकर्ते या देशात असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय? तर पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद करायचे? असेही संजय राऊत म्हणाले.सरकार आणि भाजप हे फक्त विरोधकांना चुन चुन कर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेही आता शक्य नाही. बारा दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आता हे युद्ध सराव करत आहेत. असेही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजना 1500 वरून 500 वर आली- संजय राऊत
लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. आता पाचशे रुपये देत आहेत, 1500 वरून 500 वर आले. प्रचारात 2100 रुपये देण्याचे बोलले होते. अजित पवार बोलत होते मी नाही बोललो, कर्जमाफी मी कुठे बोललो, असेही ते म्हणाले. मात्र सरकार तुमचे आहे, तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. प्रत्येक मंत्री बोलत आहे माझा पैसा, माझा पैसा. यात तुमचा पैसा कुठला? एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला आणि लाडक्या बहिणींना दिला,मात्र तुम्हाला कशाला पाहिजे पैसा? अशी टीका ही संजय राऊतांनी सरकारवर केली.
अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस
लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. आधी कसे हसत होतात, मत पाहिजे म्हणून खिशातला पैसा वळवला का सरकारी पैसा आहे, याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना देखील फसवत आहात. तुमचे जे सामाजिक विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहे. चोऱ्यामाऱ्या लांड्यालबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणं सोपं नाही. अजित दादा तिकडे बसलेले आहेत. अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस आहे. आम्ही ते पाहिलेलं आहे, असेही ते म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=Q1S0QJQ1MWM
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.