खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून जन्मदात्या बापाने पोटच्या पोराला संपवलं; कारणही आलं समोर, बीडमध्य
बीड: बीडच्या माजलगाव जवळील खानापुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या मुलाची हत्या (Beed Crime News) केली असल्याची घटना समोर आली आहे. रोहित (काळु) गोपाळ कांबळे या 20 वर्षीय तरुणाची बापानेच हत्या (Beed Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. दारू पिऊन मुलगा त्रास देत असल्याने गोपाळ विठ्ठल कांबळे यांनी मुलगा रोहितची हत्या केली आहे, राहत्या घरातच खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून त्याचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस घटनास्थळी (Beed Crime News) दाखल झाले. मात्र, मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्याला मारल्यानंतर आरोपी वडील घटनास्थळाहून थेट पोलिस ठाण्यात हजर झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दारूसाठी आईला आणि चुलतीला संपवल्याच्या घटना देखील बीडमध्ये समोर आल्या आहेत. (Beed Crime News)
दारूसाठी पैसे न दिल्याने आईचा दगडाने ठेचून खून
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे देखील अशीच एक घटना समोर आली आहे. रात्री बारा वाजताच्या सुमारास अमृत भानुदास सोन्नर (वय 45) याने आपल्या आई चोत्राबाई भानुदास सोन्नर यांचा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणामुळे वाद घालून मारहाण करून दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी अमृतला दारूचं व्यसन होतं, त्याच्या दारूला आणि त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी मुलांसह आपल्या माहेरी निघून गेली होती. त्या रात्री आई व मुलगा दोघेच घरी असताना, अमृतने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याच्या रागाच्या भरात त्याने आईचा जीव घेतला. जबर मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन आईचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अमृतला अटक केली आहे. (Beed Crime News)
कुऱ्हाडीने दारूसाठी केली चुलतीची हत्या
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे. चंद्रकांत धुराजी कावळे (वय 25) याने आपल्या चुलती परिमाला बाबुराव कावळे (वय 65) यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. चुलतीने पैसे न दिल्याने संतापून त्याने घरात असलेल्या कुन्हाडीने सपासप वार केले. डोक्यावर आणि अंगावर गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर नराधम आरोपी चंद्रकांतने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.