कर्णधार तर सोडाच, आता उपकर्णधार होणे पण झाले कठीण; जसप्रीत बुमराहबाबत टीम इंडियाने घेतला मोठा न
Team India Tour England Jasprit Bumrah : आयपीएल 2025 नंतर टीम इंडियाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, यासाठी अजूनतरी संघाची घोषणा करण्यात आली नाही. पण अशी माहिती येत आहे की,टीम इंडियाची घोषणा मे महिन्यातच होणार आहे. पण, त्याआधी एक मोठी बातमी येत आहे. ही बातमी जसप्रीत बुमराहबाबत आहे. खरंतर, आधी टीम इंडियाचे कर्णधारपद बुमराहकडे सोपवण्याची चर्चा होती. आता तो संघाचा उपकर्णधार पण राहणार नाही. इंग्लंड दौऱ्यावर त्याच्याकडून भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेतले जाईल.
इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहला मिळणार नाही ‘ही’ जबाबदारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराहने भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि कार्यवाहक कर्णधाराची भूमिका बजावली. पण, निवड समिती इंग्लंड दौऱ्यावर त्याला उपकर्णधार म्हणून कायम ठेवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात सूत्रांचा हवाला देत लिहिले आहे की, भारतीय निवड समिती बुमराहच्या कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलणार आहे. निवडकर्त्यांचे म्हणणे आहे की, बुमराह इंग्लंडमध्ये पाचही कसोटी सामने खेळणार नाही.
सूत्रांच्या हवाल्याने वृत्तांमध्ये असे लिहिले आहे की, निवडकर्त्यांची नजर सर्व 5 कसोटी सामन्यांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर आहे आणि त्याच खेळाडूला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल. बुमराह पाचही कसोटी सामने खेळणार नाही. आणि निवडकर्त्यांना प्रत्येक सामन्यात संघाला वेगळा उपकर्णधार नको हवा. म्हणूनच बुमराह उपकर्णधार असणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीतने भारतासाठी शानदार कामगिरी केली, तर इतर गोलंदाज तितके प्रभावी दिसले नाहीत. यादरम्यान बुमराहला पायाची दुखापत झाली होती, ज्यामुळे तो 3 महिने क्रिकेटपासून दूर होता. या काळात बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही. तो जवळजवळ अर्ध्या आयपीएललाही मुकला. गेल्या कॅलेंडर वर्षात, तो टीम इंडियासाठी सर्वाधिक भार उचलणारा गोलंदाज होता. त्याच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी निवडकर्त्यांना त्याला इंग्लंडविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांमध्ये खेळवायचे नाही.
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही तो दिसला नाही. पण, बुमराहचे पुनरागमन धमाकेदार झाले. त्याने आतापर्यंत एमआयसाठी 7 सामन्यात 17.72 च्या प्रभावी सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यातही तो अशीच कामगिरी करत राहील अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.