दोघांमधील संबंध अन् आर्थिक व्यवहारातून वाद, पिंपरीतील 18 वर्षीय तरुणीचा शेजाऱ्यानेच काटा काढला,

पुणे: पिंपरी चिंचवड येथे रविवारी 11 मे रोजी एका 18 वर्षीय तरुणीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये असलेल्या संबंध आणि आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजाऱ्याने केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्याला दोघांना ताब्यात घेतलं आहे. कोमल भरत जाधव (18 वर्ष) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. उदयभान यादव (वय 45) आणि त्याचा सख्खा भाचा यांना पोलिसांनी अटक केली आहे. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, खून झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती. यादव हा तिच्याच शेजारी वास्तव्यास होता. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयाभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. कोमल घराच्या खाली आली, त्यानंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरले. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

वादामुळे आरोपींनी कट रचून हत्या केल्याची शक्यता

पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात काल रात्री कोमल भरत जाधव या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून भर रस्त्यावर तिचा निर्घृण खून केला होता, या प्रकरणी उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी राहत होते, दोघांमध्ये संबंध आणि आर्थिक व्यवहार देखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्या गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.