शेण टाकायला गेली, गावातल्या मद्यपीनं काढली तरुणीची धिंड, बेदम मारहाणीसह अश्लील शिवीगाळ करत..
भंडारा: गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर शेणपुंजनं फेकण्यास गेलेल्या तरुणीला गावातीलचं एका मद्यपी इसमानं गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करीत धिंड काढली. हा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गावात घडलाय. दिनेश शिवशंकर बोंद्रे (35) रा. कोथुर्णा, असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नावं आहे. या प्रकरणात वरठी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात 324, 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Bhandara Crime)
नेमकं घडलं काय?
भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गावाबाहेरील खातकुड्यावर शेण टाकण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला गावातीलच एक मद्यधुंद इसमाने अमानुष मारहाण करून गावातून तिच्या घरापर्यंत धिंड काढली.
मुलगी मारहाणीत,’ वाचवा-वाचवा’, अशी ओरडत असतांना घरी असलेली आई आणि दोन बहिणी वाचविण्यासाठी रस्त्यावर आल्या. या इसमानं या चौघींनाही अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. पीडित 20 वर्षीय तरुणीला जबर मारहाण करण्यात आल्यानं तिच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सध्या वरठी गावात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 12 एप्रिलला रात्री घडली. गुरुवार सायंकाळी या घटनेची तक्रार दाखल करण्यात आल्यानंत रात्री पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.. घटनानंतर कुटुंबीय मानसिक धक्क्यात असून, काल दिवसभर मीडियासमोर बोलण्यास तयार नव्हते. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोथुर्णा गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
व्यसनी बापानं गतिमंद मुलीला दिल्या मृत्यूच्या वेदना
एका व्यसनी बापाने स्वत:च्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबल्याचे समोर आले आहे. आईच्या मृत्यूनंतर अक्षरशः केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली.बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक धक्कादायक (Beed Crime News) घटना समोर आली आहे. पैठणच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सूटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.