रात्रीतून 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी दरोडेखोरांनी लुटली; छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष ल
छत्रपती संभाजिनगर संतोष लादा: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी (15मे ) रात्री एक वाजून 53 मिनिटांनी दरोडेखोर संतोष लड्डा यांच्या घरात शिरले. आणि पहाटे चार वाजेपर्यंत चोरट्यांनी घर साफ केल्याची घटना घडली. पण आठ किलो सोनं आणि 40 kg चांदी या उद्योजकांना त्याच्या घरात ठेवलीच कशी? एवढ्या मोठ्या उद्योजकाच्या घराभोवती साधा सीसीटीव्ही कॅमेराही का नव्हता? असे सवाल उपस्थित होत आहे? उद्योजक संतोष लड्डा नक्की कोण आहेत? काय व्यवसाय करतात? (Crime News)
उद्योजक संतोष लड्डा नेमके कोण ?
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी सेक्टरमध्ये असणाऱ्या बड्या कंपनीचे मालक संतोष लड्डा यांच्या राहत्या घरी दरोडा पडला .त्यांच्या घरातून 8 किलो सोना आणि 40 किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केली . उद्योजक संतोष लड्डा मूळचे बीडच्या अंबाजोगाईचे .त्यांची वाळूज एमआयडीसी के सेक्टरमध्ये दिशा ऑटो कंपनीज PVT नावाची कंपनी आहे .ही कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईनसाठी पार्ट बनवते .हे सर्व पार्ट एक्सपोर्टही करते .2004 पासून उद्योगपती संतोष लड्डा छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायासाठी आहेत .ते आता छत्रपती संभाजी नगरमध्येच स्थायिकही झाले आहेत . संतोष लड्डा यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो .त्याच्या दीक्षांत सोहळ्यासाठी लड्डा आणि त्यांच्या पत्नी 7 मे ला अमेरिकेला गेल्या होत्या . त्यावेळी 15 मे रोजी एक वाजून 53 मिनिटांनी दरोडेखोरांनी संतोष लड्डा यांच्या घरातून कोट्यवधींचा ऐवज लंपास केला .चोरट्यांनी देव ही सोडले नाहीत
उद्योजक यांच्या देवघरातील चांदीचे देव बालाजी मूर्ती ही चोरट्यांनी पळवली. संतोष लड्डा यांच्या घरातील आठ किलो सोन्यापैकी अडीच किलो सोना घरातच आढळून आलं. आठ तर आठ किलो चांदी ही घरातच मिळाली.
शस्त्राचा धाक दाखवत दरोडेखोरांनी डाव साधला
घरात संजय झळके नावाचे त्यांचे ड्रायव्हर होते .बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी ड्रायव्हरचे हातपाय बांधले आणि झळके यांचा फोनही चोरट्यांनी काही अंतरावर फेकून दिला .हातपाय बांधलेल्या झळके यांनी आपली सुटका करत शेजाऱ्यांपर्यंत पोहोचले व घटनेची माहिती पोलिसांना दिली .या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला . शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे .मात्र एवढ्या मोठ्या उद्योजकाने घरात आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी ठेवलीच कशी ?उद्योजकाच्या घराभोवती सीसीटीव्हीचं कवच का नव्हतं ?घरासमोर सिक्युरिटी गार्ड का ठेवला नाही ?असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .
हेही वाचा:
https://www.youtube.com/watch?v=C6kokwyjlju
छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा
अधिक पाहा..
Comments are closed.