क्रौर्याची परिसीमा ! लग्नाला नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचे स्तन कापले

उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील  या गावात एका विकृत तरुणाने अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून मुलीला झाडाला बांधून तिचे स्तन कापण्याची विकृत घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील बेनीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चीड आणणारा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

विकृतीचा कळस

मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका २४ वर्षीय तरुणाचे त्याच्याच गावातील एका १७ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीने त्याला यापूर्वीच नकार दिला होता. याचाच राग मनात धरुन विकृत तरुणाने मुलीचे अपहरण करुन तिला निर्जन ठिकाणी जबरदस्तीने नेले. सुरुवातीला त्याने पिडीत तरुणीच्या स्तनांचा चावा घेत तिच्यावर भीषण अत्याचार केले. यानंतर त्याने त्या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिचे स्तन अमानुषपणे कापले.

अत्याचारानंतर आरोपीने पिडीतेला अर्धमेल्या अवस्थेत टाकून पळ काढला. जेव्हा जखमी अवस्थेत तरुणी तिच्या घरी परतली तेव्हा तिने सुरुवातीला या घटनेची वाच्यता केली नाही. पण नंतर जेव्हा तिला त्रास होऊ लागला तेव्हा मात्र तिच्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली.

पिडीता लग्नाहून परतत होती

पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार ती एका लग्नाहून परतत असताना संशयिताने तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेले आणि लग्नासाठी आग्रह धरु लागला. तिने नकार देताच त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिने अर्धमेल्या अवस्थेत टाकून पळून गेला. याउलट संशयिताच्या सांगण्यानुसार त्याचे आणि तरुणीचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

Comments are closed.