पिंक बॉल ट्रायलला मंजुरी, 'या' देशाचे क्रिकेट बोर्ड निलंबित! ICC च्या मिटींगमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) सोमवारी (1 जून) अहमदाबाद येथे संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, ज्यामध्ये जागतिक स्पर्धेची रचना सुधारणे, खेळातील नव्या कल्पनांना प्रोत्साहन देणे, तसेच महिला क्रिकेटला पाठिंबा देणे यांचा समावेश आहे. तसेच आयसीसीने एका क्रिकेट बोर्डवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.

क्रिकेट कॅनडाने आपल्या सदस्यत्वाच्या अटींचे गंभीरपणे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने त्यांना निलंबित केले आहे. मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचार या आरोपांमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यास आली आहे. असे असले तरी ते आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होत राहतील. खेळाडूंवर याचा परिणाम होऊ नये म्हणून संघाला निधी मिळत राहणार आहे.

आयसीसीने खालील बदलांना परवाणगी दिली
मंडळाने कसोटी सामन्यांमध्ये पिंक बॉल वापरण्याच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे. जेव्हा खराब प्रकाशामुळे किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे खेळात व्यत्यय येईल तेव्हा रेड बॉलऐवजी पिंक बॉल वापरला जाण्याची मंजुरी दिली आहे. यासाठी मात्र दोन्ही संघांची संमती आवश्यक आहे. खराब प्रकाशामुळे अनेकदा वेळ वाया जातो.

ब्रेकवेळी मैदानात प्रशिक्षकांना येण्याची परवाणगी
आयसीसीने खेळण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक किंवा त्यांचे नियुक्त प्रतिनिधी ड्रिंक्स ब्रेक दरम्यान खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी मैदानात येऊ शकतील. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये दोन डावांच्या दरम्यान १५ मिनिटांचा ब्रेक अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडूंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

हॉक-आय
अवैध गोलंदाजी कृतीच्या अहवालांवर विचार करताना सामना अधिकाऱ्यांना हॉक-आय डेटा वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Comments are closed.