दोन्ही देशांच्या परस्पर संमतीनेच युद्धविराम.
‘सिंदूर अभियाना’वर माजी सेनाप्रमुखांचे विधान
वृत्तसंस्था / व्ही दिल्ली
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताचे पाकिस्तानच्या विरोधात हाती घेतलेल्या ‘सिंदूर अभियान’ प्रसंगी जी शस्त्रसंधी झाली, ती भारत आणि पाकिस्तान या दोनच देशांच्या सहमतीने झाली, असे महत्वपूर्ण विधान माजी सेनाप्रमुख अनिल चौहान यांनी केले आहे. त्यांनी येथे बुधवारी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असतान या अभियानाच्या विविध पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला.
शस्त्रसंधीचा प्रस्ताव आधी पाकिस्तानने ठेवला. भारताने या प्रस्तावासंबंधात इतर कोणत्याही देशाशी चर्चा केली नाही. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ चर्चेत या प्रस्तावावर विचार करण्यात आला. हा निर्णय पूर्णत: या दोन देशांचाच होता. सहमती झाल्यानंतर भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यानंतर हल्ले थांबविण्यात आले, या माहितीचा त्यांनी पुनरुच्चार केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीचे श्रेय स्वत:कडे घेतले. अमेरिकेने मध्यस्थी केल्याने जग अणुयुद्धापासून वाचले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी अमेरिकेमुळेच झाली, असा दावा ट्रंप यांच्याकडून नंतर अनेकदा झालेला आहे.
गोपनीय माहिती बाहेर कशी आली…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचे वृत्त आधी भारताने घोषित करयचे असे ठरले होते. तथापि, भारताने ही घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर ही घोषणा करुन अमेरिकडे श्रेय वळविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे, हे वृत्त अमेरिकेला कसे कळले, हा प्रश्न याआधी उपस्थित करण्यात आला होता. ही माहिती अमेरिकेला कशी समजली, याची आपल्याला माहिती नाही. तथापि, हे वृत्त अमेरिकेला समजले होते, मात्र, ही गोपनीय माहिती भारताकडून फुटलेली नाही, ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
झाला होता वाद
शस्त्रसंधीची माहिती कोणी फोडली, यावर भारतातही मोठा वाद झाला होता. भारतातील विरोधी पक्षांनी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरविले होते. भारत सरकारकडूनच माहिती फुटल्याचा आणि भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यासाठी त्यांनी ट्रम्प यांच्या दाव्याचा आधार घेतला होता. केंद्र सरकारने त्यावेळीही या आरोपाचा ठामपणे इन्कार केला होता. आता पुन्हा एकदा माजी सेनाप्रमुखांनी सत्य स्पष्ट केले आहे.
Comments are closed.