ठाकरे-कंबोज समेट? मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे उपस्थित

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज्यातील अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. मात्र यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यामधील वैर या निमित्ताने संपलं का अशी चर्चा आता सुरू झाल्याचं दिसतंय.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीचा शनिवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रेटिंनी हजेरी लावली. या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती दिली. या वाढदिवसाला राज ठाकरे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.

आदित्य ठाकरे विरुद्ध मोहित कंबोज : ठाकरे विरुद्ध मोहित कंबोज भांडण

ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मोहित कंबोज हा संघर्ष महाविकास आघाडीच्या काळात पाहायला मिळाला होता. शिवसेना पक्ष फोडण्यामध्येसुद्धा मोहित कंबोज यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गुवाहाटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारांसोबत मोहित कंबोज दिसून आले होते. त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांच्या निशाण्यावर मोहित कंबोज होते.

त्याचवेळी मोहित कंबोज यांनीदेखील ठाकरेंवर सातत्याने टीका केली होती. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा एक व्हिडीओदेखील मोहित कंबोज यांनी शेअर केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.

Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

शनिवारी मोहिती कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे बडे नेते उपस्थित होते. त्याच कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्यामधील असलेलं वैर आता संपलं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.