वांगचुक यांच्या आंदोलनाला जवळपास सगळ्याच पक्षांचा पाठिंबा, भाजपचा नाही, असं का? प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांची टीका
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे NEET परिक्षेच्या पेपरफुटीविरोधात आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाला देशभरातील अनेत राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्थांनी, तरुणांनी पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारकडून गेल्या 20 दिवसात एकदाही वांगचुक किंवा दिपके यांच्यासोबत चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच ”वांगचुक यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा का नाही? असा सवाल केला आहे.
जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आता पाठिंबा दिला आहे @वांगचुक66 आणि @अभिजीत_दिपके NEET पेपर लीकचा निषेध आणि अपात्र मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला करण्याची मागणी.
भाजप वगळता.
का?
जोपर्यंत भाजपला लाखो लोकांची पर्वा नाही तोपर्यंत…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) १७ जुलै २०२६
”नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाविरोधात सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी केलेल्या आंदोलनाला आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीला आता जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. फक्त भाजपचा अपवाद वगळता. असे का? जे कोट्यवधी विद्यार्थी भाजपला जबाबदारी घ्यायला सांगत आहेत आणि एका चांगल्या मंत्र्यांची मागणी करत आहेत त्यांची भाजपला काहीच काळजी नाही. असे आता समजायचे का? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Comments are closed.