‘आई कुठे काय करते’ मालिकेतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या सुनेला अटक; पैसे घेताना रंगेहाथ पकडलं
मुंबई : मुंबईत खंडणीच्या एका धक्कादायक प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक महिला हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची सून असल्याचं समोर आलं आहे. दोन महिलांना ही अटक झाली आहे. या महिलांनी एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी देऊन 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. याच खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात पकडलं.
अटक झालेल्या महिलांमध्ये हेमलता पाटकर (39) आणि अमरीना जव्हेरी या दोन महिलांचा समावेश आहे. यातील हेमलता पाटकर आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील कांचन देशमुखांच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. या दोन्ही महिलांना 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांच्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यातील अंधेरी पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये हा वाद सुरू झाला होता. बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाईटच्या वापरावरून या महिला आणि बिल्डरच्या मुलांमध्ये वाद झाला होता . वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. या वादा नंतर 23 नोव्हेंबरला या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी 10 कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली. तडजोडीनंतर 5.5 कोटी रुपयांवर त्या आल्या. महिलांच्या सततच्या दबावाला कंटाळून संबंधित बिल्डरने थेट गुन्हे शाखेकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचला आणि 23 डिसेंबर रोजी लोअर परळ परिसरात या खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना महिलांना रंगीहात पकडले. दीड कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना दोन्ही महिला पकडल्या गेल्या.
नंतर चौकशीत बिल्डरच्या मुलाला खोट्या गुन्हा आता अडकवण्याची, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी गंभीर कलमांखाली महिलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. टीव्ही अभिनेत्रीच्या कुटुंबाशी थेट संबंध असलेला हा प्रकार समोर आल्याने मनोरंजन विश्वात ही चर्चेला उधाण आलं आहे .
आणखी वाचा
Comments are closed.