साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
सातारा : राज्यातील मिनी विधानसभा असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या (Election) निकालात यंदा अनेक मनोरंजक घडामोडी घडल्या आहेत. त्यात, प्रत्येक निवडणूक लढवणाऱ्या अभिजीत बिचुकलेंच्या (Abhijit bichukale) मतांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बिचुकलेंनी कमाल केली असून 4 थ्या क्रमांकाचे मतं घेतली आहेत. तर, अपक्षांमध्ये 2772 मतांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत अपक्षांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आणि एकूण तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शरद काटकर यांना 3900 मतं मिळाली आहेत.
विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना बारामती विधानसभा मतदारसंघात केवळ 68 मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली, तर त्याच विधानसभा निवडणुकीत ते सातारा-जावळी मतदारसंघातूनही निवडणुकीसाठी उभारले होते, तिथे अभिजीत बिचुकले यांना 529 मतं मिळाली होती. मात्र, आता बिचुकलेंनी विधानसभा निवडणुकांच्या मतांचा रेकॉर्ड मोडत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा विक्रम केला आहे. अभिजीत बिचुकले यांना नगराध्यक्षपदासाठी 2772 मतं मिळाली असून त्यांचे डिपॉजिटही जप्त झाले आहेत.
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा केला पराभव. त्यामुळे, सातारा भाजपचाच बालेकिल्ला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचा करिष्मा दिसून आला. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढे मतदान झालं आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान पडले. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी यापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करत 42 हजार 32 मतांनी विजयी मिळवला आहे. तर येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळाले आहेत. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.
अभिजीत बिचुकलेंना 2772 मतं
कवी मनाचे नेते आणि अगदी राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे अभिजीत बिचुकले यांना 2 हजार 772 मते मिळाली आहेत. येथील निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 54,815 मतांनी अभिजीत बिचकुले यांचा पराभव केला आहे.
हेही वाचा
भाजपचा इतिहासातील सर्वांत मोठा विजय; निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, आकडेवारीच दिली
आणखी वाचा
Comments are closed.