अभिनव बिंद्राचे आयओए निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने आयओए निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अध्यक्ष पी. टी. उषा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रघुराम अय्यर यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक केले आहे. यामध्ये त्याने खेळाडूंशी संबंधित घटना आणि निवडणूक नियमांमधील कथित विसंगतीवर स्पष्टीकरण मागितले होते. बिंद्राने याबाबत सांगितले की, निवडणुकीत कोणत्या नियमांचे पालन केले जात आहे याची त्यांना माहिती देण्यात आली होती, परंतु त्यांच्या मूळ घटनात्मक प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. हे पत्र 31 ऑक्टोबरला लिहिले होते. ते पत्र सार्वजनिक करण्यामागील कारण स्पष्ट करताना बिंद्रा म्हणाला की, त्याचे वैयक्तिक पत्र सार्वजनिक करण्यात आले होते आणि अलीकडील माध्यमांतील वृत्तांमध्येही त्याचा उल्लेख झाला होता. त्याने स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किंवा निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणे हा त्याचा हेतू नव्हता.
Comments are closed.