बांगलादेशी क्रिकेटपटूंची आयपीएल लिलावात उडी
आयपीएलच्या मैदानावर संधी मिळविण्यासाठी क्रिकेटपटू काहीही करायला तयार असतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. गेल्या हंगामात मुस्तफिझूर रहमानच्या आयपीएलमधील प्रवेशावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 9.20 कोटी रुपये मोजून संघात घेतलेल्या मुस्तफिझूरला बीसीसीआयच्या निर्देशानंतर स्पर्धेपूर्वीच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या प्रकरणामुळे हिंदुस्थान आणि बांगलादेश क्रिकेट मंडळांमधील संबंधही ताणले गेले होते. मात्र या वादाची धग कायम असतानाच बांगलादेशच्या सात क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या मिनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटले आहे
विशेष म्हणजे या सात खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक चर्चेत असलेले नाव आहे ते मुस्तफिझूर रहमानचे. मुस्तफिझूरव्यतिरिक्त नाहिद राणा, रिशाद हुसेन, हसन महमूद, तौहीद हृदॉय, तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम या सहा खेळाडूंनीही लिलावासाठी नोंदणी केली आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुख शाहरीयार नफीस यांनी या नोंदणीला दुजोरा दिला आहे. मात्र लिलावासाठी नाव नोंदवणे आणि प्रत्यक्ष संघात स्थान मिळणे या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत.
Comments are closed.