मोठी बातमी! KKRचा कोच बनला अभिषेक नायर, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? MI ने ट्विट करत केला


IPL 2026 च्या आधी KKR मुख्य प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरची नियुक्ती : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएलच्या आगामी हंगामाआधी मोठा निर्णय घेतला आहे. संघाने माजी भारतीय अष्टपैलू अभिषेक नायर (Abhishek Nair appointed Kolkata knight Riders) याला मुख्य प्रशिक्षक (head coach) म्हणून नियुक्त केले आहे. नायर याने चंद्रकांत पंडित यांची जागा घेतली आहे, ज्यांनी आयपीएल 2025 हंगामानंतर संघासोबतची साथ संपवली होती. हे आधीपासूनच चर्चेत होतं की नायरलाच ही जबाबदारी मिळणार, आणि अखेर केकेआरने याची अधिकृत घोषणा केली आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? MI ने ट्विट करत केला मोठा खुलासा

अभिषेक नायरच्या नियुक्तीनंतर लगेचच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून केकेआरमध्ये जाणार का? मात्र या अफवांना आता मुंबई इंडियन्सनेच मजेशीर पद्धतीने पूर्णविराम दिला आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून रोहित शर्मा यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आणि त्यासोबत कॅप्शन दिलं की, “उद्या पुन्हा सूर्य उगवेल, हे नक्की आहे… पण (K)night मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे.  या पोस्टमुळे स्पष्ट झालं की रोहित शर्मा कुठेही जाणार नाहीत, ते मुंबई इंडियन्सचेच कायमचा भाग राहणार आहेत.


सध्या रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याने सर्वाधिक 202 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक सामील आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा वनडे करिअर संपत असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण आता तो वनडे फॉरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज बनला. आयपीएलच्या बाबतीत सांगायचं झालं तर, गेल्या दोन हंगामांपासून हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार आहे, तरीही चाहत्यांच्या मनात रोहितची जागा कोणी घेऊ शकत नाही.

हिटमॅनचा आयपीएल रेकॉर्ड

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाच विजेतेपदे जिंकली आहेत. आयपीएलमध्ये त्याने आपल्या फलंदाजीतूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हिटमॅनने आतापर्यंत 272 सामने खेळले आहेत, 267 डावांमध्ये 29.73 च्या सरासरीने 7046 धावा केल्या आहेत, ज्याचा स्ट्राइक रेट 132.10 आहे. या काळात त्याने दोन शतके आणि 47 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 109 धावांची आहे. त्याने आयपीएलमध्ये 302 षटकार मारले आहेत. अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, त्याने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. त्याला मालिकावीर म्हणूनही निवडण्यात आले.

हे ही वाचा –

Ind vs Aus Semi Final : क्रीडा विश्व स्तब्ध! सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया खेळाडू काळी पट्टी बांधून उतरल्या मैदानात, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.