अभिषेक शर्माचा सगळ्यांसमोर हात खेचला अन्….; तरुणीने हॉटेलमध्ये काय केलं?, VIDEO
अभिषेक शर्मा आरआर वि एसआरएच आयपीएल 2026 व्हिडिओ : आयपीएल 2026 च्या 36व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सलावर शानदार विजय मिळवला. या विजयात अभिषेक शर्माची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 57 धावांची झंझावाती खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. जयपूरमध्ये विजय मिळवल्यानंतर हैदराबादचा संघ हॉटेलमध्ये परतला. अभिषेक शर्मा देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत होता. मात्र, हॉटेलमध्ये त्याच्यासोबत घडलेली एक घटना इतर खेळाडूंपेक्षा वेगळी आणि थोडी धक्कादायक ठरली.
एका मुलीने टीमच्या हॉटेलमध्ये एका फोटोसाठी अभिषेक शर्माला खेचण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/b7xj8Rc6QT
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 26 एप्रिल 2026
अभिषेक शर्माचा सगळ्यांसमोर हात खेचला अन्….;
हॉटेलमध्ये उभी असलेल्या एका मुलीने अचानक अभिषेकचा हात पकडून त्याला आपल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अचानक घडल्याने अभिषेक काही क्षण गोंधळून गेला. मात्र, त्याने लगेच स्वतःला सावरले. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत त्या मुलीपासून अभिषेकचा हात सोडवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅन मोमेंट — अभिषेक शर्मा टीम हॉटेलमध्ये 😄📸
एका चाहत्याला उत्साह आवरता आला नाही आणि त्याने अभिषेकला हॉटेलमध्ये झटपट फोटो काढण्याचा प्रयत्न केला — या सीझनमध्ये त्याला मिळणारी क्रेझ आणि प्रेम दाखवते 💥🧡 pic.twitter.com/C0e6v0aKIt
— फारुक🐦 (@uf2151593) 26 एप्रिल 2026
साधारणपणे खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर चाहते बाजूला उभे राहून फोटो किंवा सेल्फी घेण्याची संधी शोधत असतात. ती मुलगीही अशाच पद्धतीने उभी होती. पण अभिषेक दिसताच तिने अचानक त्याचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. असेही सांगितले जात आहे की, त्या वेळी तिचा बॉयफ्रेंड देखील तिथे उपस्थित होता. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
टीम हॉटेलमध्ये एका मुलीने अभिषेक शर्माला ओढले. कल्पना करा की भूमिका उलट आहेत का? pic.twitter.com/GCqMI05G4f
— दीपू (@deepu_drops) 26 एप्रिल 2026
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 5 विकेट्सने पराभूत केले. या विजयात ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्यात झालेल्या दुसऱ्या विकेटसाठीच्या 132 धावांच्या भागीदारीचा मोठा वाटा होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.