एसी लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा, पश्चिम रेल्वेच्या नियोजनावर प्रवासी; संघटनांची संतप्त प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एसी लोकल फेऱ्या सामान्य प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरल्या आहेत. ऐन ‘पीक अवर्स’ला लागोपाठ एसी लोकल फेऱ्या सोडल्या जात असल्याने सामान्य प्रवासी साध्या लोकलची प्रतीक्षा करीत स्थानकातच रखडत आहेत. महसूलवाढीचे उद्दिष्ट डोळय़ापुढे ठेवणाऱ्या रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांची गैरसोय विचारात घ्यावी, अशी मागणी करतानाच प्रवासी संघटना संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

सध्या चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 145 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. या फेऱ्यांचे नियोजन योग्य पद्धतीने केले नसल्यामुळे सामान्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या हक्कावर गदा येत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश पंडय़ा यांनी दिली.

रेल्वे प्रशासन म्हणते, आमचे योग्य नियोजन!

रेल्वे प्रशासनाने चुकीच्या नियोजनाचा दावा धुडकावला आहे. लागोपाठ एसी लोकल धावणे हे कमी वेळा घडत असेल. आमचे गाडय़ांचे नियोजन सामान्य प्रवाशांसाठीही सोयिस्कर आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments are closed.