कृषी विभागातील लाचखोर अधिकारी जाळ्यात; 30 हजार घेताना ACB कडून रंगेहाथ अटक

सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसीबीएन (एसीबी) कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नुकतेच एबीसीने सांगली (Sangli) जिल्ह्याच्या कृषी विभागातील गुण नियंत्रकाला ३० हजाराची लाच घेताना अटक केली. कृषी औषध कंपनीच्या इमारतीसाठी निरीक्षण अहवाल देताना येथील गुण नियंत्रकाने लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजाराची लाच घेतांना सांगलीच्या लाच (Bribe) लुचपत विभागाने या गुण नियंत्रकास रंगेहाथ अटक केलीय. संतोष चौधरी असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. या अटकेनंतर जिल्ह्यातील कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाच लुचपत विभागाचे उप अधिक्षक उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. तक्रारदार यांनी तळेगाव एमआयडीसी येथे कृषी औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी एमआयडीसी कडेगाव सोबत करार केला आहे. एमआयडीसी कडेगाव यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदारांनी पॅरागॉन अ‍ॅग्री केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन करून त्याचे बांधकाम पूर्ण करून एमआयडीसीकडून पूर्णत्वाचा दाखलाही घेतला आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी वितरक नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असून यासाठी मध्यस्थामार्फत कागदपत्रे तयार केली. या कागदापत्रावर जिल्हा कृषी विभागकडून इमारतीचा निरीक्षण अहवाल आवश्यक असल्याने जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी गुण नियंत्रण निरीक्षक संतोष चौधरी यांनी 35 हजार रूपये लाच मागणी केली.

गुण नियंत्रकाकडूनचा निरीक्षण अहवाल महत्वाचा असल्याने तो मिळवण्यासाठी तडजोडीअंती 30 हजार रूपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली असता याची खातरजमा करण्यात आली. आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये गुण नियंत्रण निरीक्षक चौधरी यांनी लाच म्हणून 30 हजार रूपये स्वीकारले असता लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईने कृषी विभागात खळबळ उडाली असून जिल्ह्यात या कारवाई चर्चा रंगली आहे.

हेही वाचा

कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी

अधिक पाहा..

Comments are closed.