शाळेत जाताना दोघांना सिमेंट बलकरच्या ट्रकनं उडवलं; पाचवीत शिकणाऱ्या भावाचा मृत्यू, बहिणीवर रूग्

पंढरपूर: पंढरपूर सातारा मार्गावरती भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पंढरपूर रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ दोन शाळकरी मुलांना ट्रकने उडवल्याची घटना घडली आहे. सातवीत शिकणारा चैतन्य या भावाचा जागीच मृत्यू झाला. तर नववीत शिकणाऱ्या राधिका ही बहीण गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील दोघेही बहीण-भाऊ होते. दोघेही सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात छोट्या भावाने प्राण गमावले आहेत, तर बहिणीवरती रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या अपघातात देठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राधिका धनाजी देठे व चैतन्य धनाजी देठे हे छोटे भाई बहीण भाऊ सकाळी शाळेला निघाले होते. यावेळी सिमेंट बलकरच्या ट्रकने मागून येऊन या बहिण भावांना चिरडलं, असून यात चैतन्य हा पाचवीत शिकणारा मुलगा जागीच मृत झाला आहे. तर त्याची सहावी शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

सातारा पंढरपूर रोडवर आज (मंगळवारी) सकाळी शाळेला निघालेल्या बहीण भावाला सिमेंट बल्करने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बहिणीला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. सध्या पंढरपूर परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून यामुळे अनेक रस्त्यांची अर्धवट कामे अपघाताला निमंत्रण देत असतात. आज सकाळी सात वाजता सातारा पंढरपूर रोडवर जैनवाडी येथील श्रीमंतराव काळे विद्यालय या शाळेकडे निघालेले राधिका धनाजी देठे व चैतन्य धनाजी देठे हे रस्त्याच्या कडेने पायी चालत येत असताना पाठीमागून येणाऱ्या बल्करने दोघांनाही उडवले. यात सातवीत शिकणारा चैतन्य या भावाचा जागीच मृत्यू झाला. तर नववीत शिकणाऱ्या राधिका ही बहीण गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. संतापजनक बाब म्हणजे या बहीण भावांना धडक देणारा बल्कर तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्याला वाखरी जवळ अडवले आणि चालकासह बल्कर ताब्यात घेतला आहे. दरम्यान या घटनेमुळे धनाजी देठे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेफान वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुले ही आता सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. शाळेजवळ आता या मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी ही जोर धरत आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.