रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण, आग्र्याहून 15 व्या आरोपीला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आग्र्याहून आणखी एका आरोपीला पकडले. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या 15 इतकी झाली आहे.

1 फेब्रुवारी रोजी रोहित शेट्टी यांच्या जुहूतील घरावर बेछूट गोळीबार झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली होती. ते सर्व सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणात गुन्हे शाखेने आग्रा येथून प्रदीपकुमार जाठव ऊर्फ गाठ (22) याला अटक केली आहे. गोळीबार झाला त्यादिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहण्याबरोबर इतर आरोपींना आवश्यक ती मदत केल्याचा प्रदीपवर आरोप आहे.

Comments are closed.