अभिनेता पॉल वेस्ली याने लग्न केले.
मैत्रीण नताली कुकेनबर्गशी लग्न केले
‘द वॅम्पायर डायरीज’मध्ये स्टीफन साल्वाटोरची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता पॉल वेस्लीने स्वत:ची दीर्घकालीन पार्टनर नताली कुकेनबर्गसोबत विवाह केला आहे. या जोडप्याने एका खासगी सोहळ्यात विवाह केला असून यात केवळ एक मिनिस्टर अन् पाळीव श्वान ग्रेग सामील झाला होता.
कुकेनबर्गने विवाहाची घोषणा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केली आहे. तसेच याची छायाचित्रे देखील शेअर केली आहेत. ‘मिस्टर अँड मिसेस अँड द बेस्ट बॉय ग्रेग’ अशी कॅप्शन तिने जोडली आहे. विवाहाचा सोहळा अत्यंत खासगी स्वरुपाचा होता. यात विवाह लावून देणारे मिनिस्टर अन् ग्रेगच उपस्थित होते. अतिथींची यादी छोटी ठेवूनही या जोडप्याने विवाहासाठी क्लासिक वेडिंग लुक निवडला होता.
यादरमयन कुकेनबर्गने डिझाइनर गॅलिया लाहवचा पांढरा सिल्क स्पॅगेटी-स्ट्रॅप गाउन परिधान केला होता, तर वेस्लीने काळ्या रंगाच्या टायसोबत निळा सूट परिधान केला होता. या दांपत्याला अभिनेत्री नीना डोबरेवने शुभेच्छा दिल्या आहेत. नीनाने ‘द वॅम्पायर डायरीज’मध्ये वेस्लीसोबत काम केले होते.
वेस्ली आणि कुकेनबर्गने 2025 मध्ये एंगेजमेंट केली होती. वेस्लीचा हा तिसरा विवाह आहे. यापूर्वी 2011-13 दरम्यान तो टोरी डेविटोसोबत विवाहबंधनात होता. तर 2019-22 या कालावधीत तो ज्वेलरी एक्झिक्यूटिव्ह इनेस डी रेमनसोबत संसार करत होता. तर वेस्ली अन् कुकेनबर्ग चार वर्षांपासून एकत्र आहेत.
Comments are closed.