आदित्य ठाकरेंनी 8 जूनचं मोबाईल लोकेशन दाखवावं, ही ओपन अँड शट केस; नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

मुंबई: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. या मंत्र्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज (गुरुवारी) सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत करण्यात आली. दिशा सालियनच्या (Disha Salian Case) वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांचा हत्याप्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील सरकारने याची दखल घ्यावी आणि दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेल्या नावांची चौकशी करावी असं म्हटलं आहे.

सभागृहाबाहेर बोलताना नितेश राणे म्हणाले, दिशा सालियनच्या वडिलांनी पिटीशन दाखल केलं आहे. त्यानुसार आम्ही सभागृहात एवढी मागणी केली आहे की, महिलांवरती बलात्कार होतो, त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यावं आणि त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, बलात्काराचा आरोप झाला तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करत चौकशी करावी लागते. दिशाच्या वडीलांनी जे आरोप केले आहेत, त्यानुसार कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. सरकारने या सगळ्याची दखल घ्यावी असं आमचं म्हणण आहे.

एसआयटी चौकशीवर काय म्हणाले राणे?

नितेश राणे एसआयटी चौकशीबाबच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक करावी असे कोर्टाचे निर्देश आहेत. एसआयटीमधील अधिकारी चिमाजी आढाव हा त्या प्रकरणात सहभागी होता. मला कुणाच्या समोर बोलवताय, आम्हाला ज्या व्यक्तीवर संशय होता त्यालाच आम्ही पुरावे कसे देणार. या प्रकरणातील काही जणांना त्यांनी मदत केली, आणि आम्ही त्याला पुरावे दिले असते तर त्यांनी ते पुरावे आरोपींना दिले असते, असं म्हटलं आहे. SIT च्या अधिकाऱ्यांना काय पत्र दिलं हे तुम्हाला माहिती आहे का? चिमाजी आढाव नावाचा एक अधिकारी यामध्ये केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, त्याला केस मध्ये ठेवू नये असं म्हणालो होतो. आम्हाला ज्या व्यक्तीवर संशय होता त्यालाच आम्ही पुरावे कसे देणार. त्याच्या समोर चौकशीला मी कसं जाणार? असं पत्र मी एसआयटीला दिलं होतं, अशी माहिती देखील नितेश राणे यांनी दिली आहे.

तिच्या वडिलांनी तीन नाव दिले आहे. त्यांना अटक करावी अशी मागणी आम्ही केली आहे. आपला देश कायद्यानुसार चालतो आणि कायद्यानुसार ही अटक व्हायला हवी. लाडक्या बहिणीने राज्यात सरकार आणलं आहे, त्यामुळे त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. कलानगर भागात किंवा इतरत्र शक्ती कपूर फिरत असेल त्यांना अटक केली पाहिजे असंही पुढे नितेश राणे म्हणाले आहेत.

सरकारचे प्रमुख काय निर्णय घेतात हे आम्ही बघू. सुप्रीम कोर्टचा कायदा असा म्हणतो, बलात्काराचा आरोप आहे त्यांना तातडीने अटक केली जावी. आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्यामुळे ते दबाव आणू शकतात. त्यामुळे नैतिकता म्हणून आमदार राहू नये. आपण काळा ठपका का लावून घेतो याचा विचार आदित्य ठाकरे यांनी केला पाहिजे. आपण त्यादिवशी कुठे होतो? 8 जूनचं मोबाईल लोकेशन दाखवावं, आपलं मोबाईल लोकेशन काय होतं? ते सगळ्यांची उत्तर त्यांनी द्यावी. नितेश राणे खोटे बोलत आहेत हे त्यांनी सांगावं, ही ओपन आणि शट केस आहे. यात सुप्रीम कोर्टात स्पष्ट नाव घेण्यात आली आहेत, असं आव्हान देखील नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.

आधी आम्ही आरोप करत होतो, तर राजकीय हेतूने करत असल्याचं म्हटलं जात होतं. आता तिच्या वडिलांनी आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी हे प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला काय़ तिचा मृतदेह फाॅरन्सिकला का नाही पाठवला? 14व्या माळ्यावरून ती पडली तर तिच्या अंगावर एक खरचटल्याचे व्रण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरेंनी उन्माद केला आहे, केलेली कर्म इथेच फेडायची असतात, असंही पुढे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=S0fqbeelw-o

अधिक पाहा..

Comments are closed.