शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार (Ncp Ajit Pawar)आणि शरद पवार (Ncp Sharad Pawar) यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे जवळपास निश्चित केले आहे. बैठका, जागावाटप देखील सुरू आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार यावरून शरद पवार (Ncp Sharad Pawar) गटात नाराजी उफाळून आली होती. शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने पक्षाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अखेर सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगल्या आहेत.(Ncp Sharad Pawar)
Prashant Jagtap: जगताप हे काँग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत असल्याने नाराज असलेले प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर जगताप हे काँग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊ निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे जगतापांच्या पुढच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे पक्षातील काही नेते हे प्रशांत जगताप यांच्या संपर्कात होते. मात्र प्रशांत जगताप यांनी मी काँग्रेस विचाराचा असल्याच स्पष्ट केलं. त्यामुळे जगताप हे आता काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Prashant Jagtap: 27 वर्षांनंतर सोडला पक्ष
27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार जगताप यांनी मानले.
Prashant Jagtap: मी राजकारणातून बाहेर गेलो नाही, नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार
एका पराभवामुळे भीती बाळगणारा मी नाही. विधानसभेत मी हरलो पण मला तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रती मला आदर आणि मान असल्याचे जगताप यावेळी म्हणाले. पार्टी कशी निवडणूक लढवेल याची मी तयारी केली होती. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यथित झाला होता. माझ्या मनात विचारांची घालमेल होती. पण घालमेल माझ्या आयुष्यावर उलटल्याचे प्रशांत जगताप म्हणाले. सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सगळे प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन आणि सगळ्या नेत्यांचा मान ठेऊन मी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहे. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही असेही त्यांनी सांगितले. मी राजीनामा शशिकांत शिंदे यांना मेल केला आहे. नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
Prashant Jagtap: सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिला राजीनामा
राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. मात्र त्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा होती. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी दर्शवलेला तीव्र विरोध त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन दिवसात आपण राजीनाम्याचा निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर मंगळवारी आणि आज असे दोन दिवस प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज शहराध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Prashant Jagtap: शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार
सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्याची मला संधी मिळाली. पक्षात खूप चांगल्या पद्धतीने मी कामकाज केले. हडपसर वानवडी परिसरातील नागरिकांनी मला दादा दिली. मी रस्त्यावर उतरून काम केले. हे मी पुणेकर यांच्यासाठी केले. त्यामुळे मी सर्वप्रथम शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानतो. मी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलो आहे. मात्र आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहराध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी शशिकांत शिंदे यांना राजीनामा पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.