वय फक्त आकडा… साठीतील मिलिंद सोमणचा युरोपमध्ये डंका, पोहून पार केली 15 किलोमीटरची जिब्राल्टर सामुद्रधुनी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वय हा निव्वळ एक आकडा आहे हे वाक्य मिलिंद सोमण यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. वयाच्या साठाव्या वर्षात रिटायरमेंट घेऊन स्वस्थ बसणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फिटनेस आयकाॅन मिलिंद सोमण हे मात्र याला अपवाद ठरले आहे. मिलिंद सोमण यांच्या फिटनेसची ख्याती ही हिंदुस्थानसह युरोपमध्येही पसरली आहे. त्यामुळेच फिटनेस आवडणाऱ्यांसाठी मिलिंद सोमण हे आयडाॅल म्हणून ओळखला जातात.

१ मे रोजी, मिलिंद सोमण यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. स्पेनमधील तारिफा येथून सुरुवात करून, त्यांनी मोरोक्कोच्या किनाऱ्यापर्यंत सुमारे १५ किलोमीटरचे अंतर पोहून पार केले. यावर बोलताना ते म्हणतात की, हे सोपे काम नव्हते. प्रचंड लाटा, थंड पाणी आणि अनेक तास सतत पोहणे यामुळे हे एक मोठे आव्हान बनले होते असे वृत्त एबीपीने दिले आहे.

विशेष गोष्ट ही आहे की हा प्रवास केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नव्हता, तर युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांना जोडणारा होता. मिलिंद सोमण यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून युरोपपासून अमेरिकेपर्यंत आपले फिटनेस कौशल्य सिद्ध केले आहे. यापूर्वी गोव्यात २० किलोमीटर पोहण्याची स्पर्धा पूर्ण केली होती, जी एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती. २०२६ मध्येही, ते आपला फिटनेस प्रवास पुढे नेत आहेत आणि नवीन ध्येये गाठत आहेत. त्यांची मेहनत आणि शिस्त हे स्पष्टपणे दर्शवते की तंदुरुस्त राहणे म्हणजे केवळ जिममध्ये जाणे नव्हे, तर एक निरोगी जीवनशैली अंगीकारणे होय.

Comments are closed.