सरके चुनर गाण्याचा वाद थांबेना; अभिनेत्री नोरा फतेहीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे मागितली लेखी माफी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

“केडी: द डेव्हिल” या चित्रपटामधील मधील “सरके चुनर” या गाण्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शमला नाही. या गाण्यावरून उभा राहिलेला गदारोळ अजूनही सुरूच आहे. आता या गाण्याच्या वादावरून नोरा फतेही राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाली. सुनावणीदरम्यान,नोराने आयटम साँग सादर केल्याबद्दल आयोगाकडे लेखी माफी मागितली. नोराने म्हटले आहे की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता.

अभिनेत्री म्हणाली, “मी आयोगाकडे माझी माफी मागितली आहे. एक कलाकार म्हणून मला जबाबदार राहावे लागेल. मी काही अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.” यापूर्वी, २७ एप्रिलला संजय दत्त महिला आयोगासमोर हजर झाला होता. त्यानेही अश्लील गाण्यात काम केल्याबद्दल माफी मागितली होती असे वृत्त आज तक ने दिले आहे.

नोरा फतेहीचे अश्लील गाणे यूटय़ुबवरून हटवले

हे वादग्रस्त गाणे नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्याची हिंदी आवृत्ती प्रदर्शित झाली, तेव्हा हा वाद निर्माण झाला. १६ मार्च रोजी प्रदर्शित होताच या गाण्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. गाण्याच्या अश्लील आणि बिभत्स गीतांवर नोराच्या अश्लील नृत्याने लोकांना धक्का बसला. केवळ गाणे आणि त्याच्या निर्मात्यांनाच ट्रोल केले गेले नाही, तर जनतेने नोरा आणि संजय दत्त यांच्यावरही जोरदार टीका केली. सोशल मीडियावर नोराच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

सार्वजनिक ट्रोलिंगनंतर ‘सरके चुनार’ हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले. नोराने स्पष्ट केले की, निर्मात्यांनी तिला न कळवता गाण्याची हिंदी आवृत्ती प्रदर्शित केली होती. तिने हे गाणे कन्नडमध्ये चित्रित केले होते. त्यावेळी तिला गाण्याच्या अश्लीलतेबद्दल माहिती नव्हती आणि गाण्याचे बोलही माहीत नव्हते. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि गीतकार यांनीही या गाण्यासंदर्भात माफी मागितली आहे.

Comments are closed.