कृषी पूरक साहित्य घोटाळा समाजकल्याण विभागाकडून मान्य; दडवून ठेवलेला अहवाल ‘एबीपी माझा’च्या हाती

नागपूर बातम्या: जिल्हा खनिज निधीतील कृषी पूरक साहित्य घोटाळा (Scam) प्रकरणात महिला बचत गटांची समाजकल्याण विभागाच्याच अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचे स्वतः समाजकल्याणच्या चौकशी अहवालात मान्य केले आहे. जानेवरी 2024 मध्ये तयार झालेल्या या चौकशी अहवालनंतर कारवाई होण्याच्या भीतीपोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा चौकशी अहवाल दाबून ठेवला आहे. मात्र समाजकल्याण विभागाचा हाच सहा सदस्यांच्या चौकशी समितीचा अहवाल ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. यात महिला बचत गटाची फसवणूक झाल्याचे स्वतः समाजकल्याण विभागाने आपल्या चौकशी अहवालात सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी महिलाबचत गटासोबत फोटो काढले, अन् साहित्य परत घेतलं

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या श्री साई ट्रेडिंग एजेंसी मार्फत साहित्य पुरवण्यात आली त्यावर दिलेल्या पत्त्यावर ती अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत पुढे आले आहे. महिलांच्या कौशल्य विकासासाठी नागपूरच्या समाजकल्याण विभागाच्या मार्फत जिल्ह्यातिल 100 महिला बचतगटांना 90 टक्के अनुदानावर शेतीपूरक साहित्य वितरित करण्यात आले होते. यात प्रत्येक महिला गटांना 7 लाख  मळणी यंत्र, कल्टिव्हेटर, साठवणूक साहित्य होते. मात्र समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलाबचत गटासोबत फोटो काढून योजना यशस्वी झाल्याचे जाहीर केले व साहित्य दोन दिवसानंतर परत घेऊन गेले. ही बाब महिला बचतगटांना जेव्हा लक्षात आले कि आपली फसवणूक झाली, तेव्हा महिलांनी आंदोलन उभे केले.  त्यानंतर हि चौकशी समिती गठित करण्यात आली होती.

….तर आपण प्रधानमंत्र्यांकडे तक्रार करणार- श्यामकुमार बर्वे

यानंतर या दोषी अधिकार्‍यांवर कुणाचा वरदहस्त आहे? कोण दोषी अधिकाऱ्यांना वाचवत आहे? असे प्रश्न रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपस्थित केला आहे. दोषींवर कारवाई झाली नाही तर आपण प्रधानमंत्र्यांकडे याची तक्रार करणार असल्याचे श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरमध्ये समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच काही महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांशी हातांशी पकडून मोठा घोटाळा (Scam) केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात तब्बल 8 कोटी 71 लाख रुपयाचे कृषी पूरक साहित्य वाटपात घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. जिल्ह्याच्या खनिज निधीतून 100 महिला बचत गटाला कृषिपूरक साहित्य वाटण्याची योजना तयार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी त्यासाठी 100 महिला बचत गटाची निवड केली आणि साहित्याचा वाटप केला गेला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी फोटो काढून योजना यशस्वी झाल्याचे दाखवले. मात्र काही दिवसानंतर  पुरवठादाराने वितरित साहित्य परत नेलं असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

अधिक पाहा..

Comments are closed.