शाळेत नोकरीला लावण्याचं आमिष, 25 वर्षीय तरुणीसोबत नको ते केलं, शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचं

अहिल्यानगर क्राईम न्यूज: अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar faction) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांच्यावर एका 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime News:  नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचाराचा आरोप

फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अहिल्यानगर शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime News: व्हिडिओ कॉलवरूनही त्रास

तक्रारीनुसार, आरोपी वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडत असे आणि तिला तासनतास त्रास देत असल्याचा आरोप आहे. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

Ahilyanagar Crime News: व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

अत्याचार करताना आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar Crime News:  पोलिसांकडे पुरावे सादर

पीडित तरुणीने या संदर्भातील काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती मिळत आहे. या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, शहराचे माजी महापौर आणि राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्यामुळे अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime: ‘कॉलेजला जाते’ सांगून 15 वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडली, नराधमांनी अपहरण करून घनदाट जंगलात नेलं, 5 दिवस डांबून ठेवत नको ते केलं, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Crime: निर्जन रानात 25 वर्षीय तरुणीची बॉडी आढळली, अंगावर काळे कपडे, मृतदेहाजवळ पिझ्झा अन्…; नाशिकमध्ये खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.