Ahilyanagar news – गोधेगावमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; आधी कुत्र्याला फस्त केले, नंतर घरात घुसून महिलेवर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेवासा तालुक्यातील गोधेगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी पहाटे बिबट्याने आधी एका कुत्र्याला ठार केले, त्यानंतर घरात झोपलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कुसुम हिरामण पल्हारे (वय – 61) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू असताना पुन्हा हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.