दोन पायावर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील! वारीस पठाण यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल


Waris Pathan on Nitesh Rane : एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची आज अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) मुकुंदनगरच्या सी.आय.व्ही ग्राउंडवर ओवैसींची जाहीर सभा झाली. या सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं. येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणेंवर हल्लाबोल केला.

भाजपचे काही लोक द्वेष पसरवत आहेत

भाजपचे काही लोक द्वेष पसरवत असल्याचे वारीस पठाण म्हणाले. यावेळी बोलताना मंत्री वारीस पठाण यांनी नेपाळी म्हणत नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असे नितेश राणे म्हणतात. पण येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी राणेंवर टीका केली. लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांसाठी एमआयएम कायम तयार असल्याचे वारीस पठाण म्हणाले.

आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करतोय

आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहोत, तरीदेखील आमच्यालोकांना अटक केली जात असल्याचे पठाण म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण खराब होईल असे आपल्यालाला कावाटते? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. विकासावर बोलण्यात यांच्याकडे काहीच नाही. हे सर्व लोक फेल झाले आहेत. यांचे एकच काम आहे, ते म्हणजे द्वेष पसरवणे असे पठाण म्हणाले. यावेळी पठाण यांनी काँग्रेसवर देखीलटीका केली. 70 वर्ष जे सत्तेत बसले त्यांनीही आमच्यासाठी काही केलं नसल्याचे पठाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकाही मुस्लिम नेत्याला तिकीट दिलं नाही. हे भविष्यात आपल्याला काय देणार? असा सवाल देखील पठाण यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा

आणखी वाचा

Comments are closed.