AI चा वापर जबाबदारीने व्हायला हवा, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्याच्या घडीला AI हे माध्यम जगभरात चर्चेचा विषय बनलेले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकासात पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी AI ला या युगातील निर्णायक तंत्रज्ञान म्हणून संबोधले आहे. अमेरिकेला हे तंत्रज्ञान जबाबदारीने विकसित करण्याचे आवाहन केले आहे. एआयचा वापर योग्यपद्धतीने आणि योग्यठिकाणी झाल्यास, याचा अमेरिकन नागरिकाला फायदा होणार आहे.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये, पिचाई यांनी AI चे वर्णन आतापर्यंतचे सर्वात महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असे केले आहे. तसेच एआयच्या परिणामांची तुलना त्यांनी अमेरिकेने केलेल्या पूर्वीच्या तांत्रिक क्रांतीशी केली आहे.

सुंदर पिचाई यांनी एआयचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कशापद्धतीने करु शकतो यावरही भाष्य केले. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर करुन आपण सहजसुलभ जगू शकतो हेही सांगितले. वैद्यकीय, शैक्षणिक तसेच इतर अनेक क्षेत्रामध्ये एआयचा वापर हा करता येऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. एआयबद्दल आशावादी असताना, पिचाई यांनी याकरता लागणारे मनुष्यबळ तसेच योग्य शिक्षण घेणेही गरजेचे आहे हेही मान्य केले. पिचाई यांच्या मते, नियमन आणि मनुष्यबळ प्रशिक्षणातील गुंतवणूक ही एआयकडे जाण्यासाठी फार महत्त्वपूर्ण पावले आहेत.

Comments are closed.