ट्रेंड – बॅटरी रिचार्जसाठी रोबोटला हवेत पैसे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एआय रोबोट गुडघ्यावर बसून भीक मागतानाचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एआय रोबोटला विजेचे बिल भरायचे असून बॅटरी रिचार्ज करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे तो लोकांकडे मदत मागत आहे. विशेष म्हणजे, लोकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी त्याच्याजवळ एक ताटली ठेवण्यात आली असून डिजिटल पेमेंटसाठी क्युआर कोडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी रोबोटची फिरकी घेत आहेत. @theOGalv या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीयो चीनमधील सिचुआन प्रांतातील असल्याचे समजते. हा रोबोट खराखुरा भिकारी नसून हा एखादा मार्केटिंग स्टंट किंवा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेला आगळावेगळा प्रयोग असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Comments are closed.