AIADMK ची भाजपला शरणागती: राहुल गांधी
वृत्तसंस्था/ कन्याकुमारी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे जाहीर सभा घेत भाजप तसेच संघाला लक्ष्य केले आहे. अण्णाद्रमुकने थेट भाजपसमोर आत्मसमर्पण केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी भ्रष्टाचारामुळे भाजपसमोर शरणागती पत्करली आहे. राज्यात भाजप स्वत:ची पकड मजबूत करण्यासाठी अण्णाद्रमुकचा वापर करत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्रविड विचारसरणी पसंत नाही आणि तामिळनाडूवर संघ स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करू पाहत आहे. तामिळनाडूची ओळख, भाषा आणि संस्कृतीला वाचविण्यासाठी संघाला रोखणे आवश्यक आहे. भाजप थेट स्वरुपात तामिळनाडूत मजबूत होऊ शकत नाही, याचमुळे तो अण्णाद्रमुकद्वारे राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
Comments are closed.