ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय शिवराय’चा नारा; म्हणाल्या, आम्ही इथून एक इंचही हटणार ना
रुहिनाझ शेख व्हिडिओ: एआयएमआयएमच्या (AIMIM) वतीने गुरुवारी (दि.09) मुकुंदनगर, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पक्षाच्या महिला पदाधिकारी रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय शिवराय” या जयघोषाने केली, त्यांच्या या घोषणेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रुहीनाज शेख यांनी केलेल्या घोषणेनंतर काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले असावेत, हे ओळखून त्यांनी भाषणातच याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “एक बुरखेवाली इथे आल्यानंतर ‘जय शिवराय’ कसं म्हणू शकते, असं काहींना वाटलं असेल. पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे नव्हते. त्यांनी 12 बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यामध्ये मुस्लीम समाजही होता,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
Ruhinaz Shaikh: आम्ही इथून एक इंचही हटणार नाही
रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर भर दिला आणि समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तींवर सडकून टीका केली. “आज काही लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न चालतोय. पण आम्ही इथून एक इंचही हटणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. रुहीनाज शेख यांच्या भाषणाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
https://www.youtube.com/watch?v=eanjbrtut9g
आसादादिनी ते नॉनड्रा मोदी आणि डी वेद्रा फेडनाविस: ओआसिंची मोदी, फडनविसनवर
दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी या सभेत जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची स्तुती करतात. मी त्यांचा निषेध करतो. नेतान्याहू याने 60 हजार लोकांचा खून केला. त्यामध्ये 20 बालके तर 20 हजार महिला आहेत. त्याने लाखो लोकांना बेघर केलं. अशा नेतृत्वाची तुम्ही स्तुकी करता? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तर मराठवाड्यात आलेल्या पुरावर बोलताना ओवैसी यांनी “महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. पण देवेंद्र फडणवीसांनी मोठं मोठे आकडे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींप्रमाणेच खोटं बोलतात. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे जाऊन बसले पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आणखी वाचा
दोन पायावर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील! वारीस पठाण यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
आणखी वाचा
Comments are closed.