एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज मोफत

एअरटेल मुंबई: भारती एअरटेल आणि गुगल यांनी आज अशी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे, जी एक लक्षवेधक गुगल वन क्लाउड स्टोरेज सब्सक्रिप्शन सेवा एअरटेल ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे आणि त्यायोगे मर्यादित डिव्हाइस स्टोरेजच्या वाढत्या आव्हानावावर उपाय काढण्यास मदत करत आहे. सर्व पोस्टपेड आणि वाय-फाय ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता सहा महिन्यांकरीत 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज उपलब्ध असणार आहे. त्यांना पाच अतिरिक्त लोकांसोबत हे स्टोरेज वाटून घेता येणार आहे.

सदर भागीदारीने वापरकर्त्यांना भेडसावणाऱ्या वाढत्या डेटा स्टोरेज मर्यादांच्या अडचणीवर मात करण्याचे उद्देश ठेवले आहे आणि हे, फाइली वारंवार काढून न टाकता किंवा महागड्या भौतिक स्टोरेज विस्तारांचा आधार न घेता ग्राहकांकडे त्यांच्या प्रिय फोटो, व्हिडीओ, दस्तऐवज आणि इतर डिजिटल सामग्री साठवण्यासाठी पुरेशी जागा आहे, याची खात्री करून, साध्य केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, गुगल अकाऊंट स्टोरेजमध्ये अँड्रॉइडवरील व्हॉट्सॲप चॅट्सचा बॅकअप घेतला जातो आणि त्यामुळे ग्राहकांना डिव्हाइस स्विच करणे सोपे बनते. क्लाउड स्टोरेजची तरतूद अँड्रॉइड आणि आय.ओ.एस दोन्ही प्लॅटफॉर्मशी सुसंगत आहे आणि म्हणून एअरटेलच्या विविध ग्राहक बेससाठी ते व्यापकपणे उपलब्ध आहे.

सिद्धार्थ शर्मा, डायरेक्टर मार्केटिंग आणि सी.ई.ओ – कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले, “वैयक्तिक व व्यावसायिक माहिती हाताळण्यासाठी स्मार्टफोन्स हे मुख्य डिव्हाइस बनल्याने वापरकर्त्यांना स्टोरेज एक महत्वपूर्ण चिंतेच्या रूपात सतावत असते. या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी आम्ही आनंदाने गुगल सोबत सहयोग करून आमच्या ग्राहकांना विश्वसनीय, सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ स्टोरेज उपाय प्रदान करीत आहोत. या भागीदारीमुळे आमच्या कोट्यवधी पोस्टपेड, वाय-फाय ग्राहकांसाठी एक संधी उपलब्ध केली जाणार असून त्यांना आणखी 100 जीबी स्टोरेज मिळणार आहे.”

कॅरेन टिओ, व्हाईस प्रेसिडेंट, प्लॅटफॉर्म्स अँड डिव्हाइस पार्टनरशिप्स, ॲपॅक, गुगल म्हणाले, “आम्ही आनंदाने एअरटेल सोबत भागीदारी करून भारतातील कोट्यवधी लोकांना गुगल वन उपलब्ध करून देत आहोत. एकत्र येऊन, गुगल फोटोज, ड्राइव्ह, जीमेल आणि इतर ठिकाणी अधिक स्टोरेज देऊन आम्ही आमच्या वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरील फोटो, व्हिडिओ आणि महत्वाच्या फाइलींचे बॅकअप सुरक्षित पद्धतीने घेणे सोपे बनविणार आहोत.” प्रास्ताविक ऑफरच्या रूपात पहिल्या सहा महिन्यांसाठी कोणताही अतिरिक्त खर्च न करता, 100 जीबी क्लाउड स्टोरेज सक्रिय केले गेल्यापासून, उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या डेटाचा बॅकअप घेता येणार असून क्लाउड स्टोरेजच्या सोईचा अनुभव घेता येणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना फक्त एअरटेल थँक्स ॲपवर लॉगिन करावे लागणार आहे. कोणतेही शुल्क न भरता सहा महिने 100 जीबी स्टोरेज उपलब्ध केले जाणार आहे. एखाद्या ग्राहकाने सबस्क्रिप्शन सुरू ठेवायचे नाही असे ठरविले तर त्यास गुगल वनचे सदस्य राहणे बंद करता येईल.

गुगल वन स्टोरेज घेऊन सदस्यांना खालील गोष्टी करता येतील-

● गुगल फोटोज, ड्राइव्ह आणि जीमेलवर वापरण्यासाठी 100 जीबी क्लाउड स्टोरेज मिळविता येईल.

● फोटो, फाइली आणि व्हॉट्सॲप चॅट किंवा नवीन फोनवर स्विच करताना क्लाउडवर सुरक्षितपणे बॅकअप घेता येईल.

● अतिरिक्त पाच लोकांसोबत कोणताही अतिरिक्त खर्च न करता कुटुंबात वाटून घेण्याचा लाभ उचलता येईल.

गुगल वन जोडले गेल्याने, एअरटेलच्या ग्राहकांना चुटकीसरशी डिजिटल सब्सक्रिप्शन पर्यायांचा अप्रतिम खजिना मिळणार असून आपल्या ग्राहकांना सकल आणि समृद्ध डिजिटल जीवनशैली अनुभव उपलब्ध करून दण्यात एअरटेलचे अग्रगण्य स्थान सिद्ध करणार आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.