अजिंक्य रहाणेनं मुंबईचं कर्णधारपद सोडलं, नवा कॅप्टन कोण होणार? ‘या’ खेळाडूचं नाव चर्चेत
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे यानं मुंबई क्रिकेट टीमच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणे यानं ही घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक्सवर पोस्ट करत केली. अजिंक्य रहाणे यानं कर्णधारपद सोडल्यानं मुंबई क्रिकेटचा नवा कॅप्टन कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजिंक्य रहाणे यानं काय म्हटलं?
मुंबई संघाचं नेतृत्व करणं आणि स्पर्धा जिंकणं हे सन्मानजनक आहे.देशांतर्गत क्रिकेटचा नवा सीझन सुरु होत आहे, मला वाटतं नवं नेतृत्व विकसित होण्यासाठी योग्य वेळ आहे, त्यामुळं यापुढं मुंबईच्या टीमचं कर्णधारपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. कर्णधार पद सोडलं असलं तरी खेळाडू म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन सोबतचा प्रवास सुरु असेल. येत्या हंगामात आणखी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करु, असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
अजिंक्य रहाणे यानं 201 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 14000 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात मुंबईनं 7 वर्षानंतर रणजीचं विजेतेपद विदर्भ संघाला अंतिम फेरीत पराभूत करुन 2023-24 च्या हंगामात मिळवलं. याशिवाय इराणी ट्रॉफीत देखील विजेतेपद मिळवलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईच्या संघासाठी अजिंक्य रहाणेची कामगिरी महत्त्वाची ठरली.
मुंबईचा नवा कॅप्टन कोण?
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार शार्दुल ठाकूरचं नाव मुंबईच्या कॅप्टनपदासाठी विचारात घेतलं जाऊ शकतं. दुलीप ट्रॉफीसाठी शार्दुल ठाकूर पश्चिम विभागाचा कॅप्टन आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे वरिष्ठ सदस्य अजिंक्य रहाणेचं मत विचारात घेऊ शकतात.
शार्दुल ठाकूरनं गेल्या वर्षीच्या हंगामात 505 धावा केल्या होत्या, तर 35 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर शार्दुल ठाकूरला इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत टीम इंडियामध्ये स्थान मिळालं होतं.
मुंबई संघासह कर्णधार आणि विजयी चँपियनशिप हा एक संपूर्ण सन्मान आहे.
पुढे नवीन घरगुती हंगामात, माझा विश्वास आहे की नवीन नेत्याला उचलण्याची ही योग्य वेळ आहे आणि म्हणूनच मी कर्णधारपदाच्या भूमिकेत न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मी माझे सर्वोत्तम देण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे…
– अजिंक्य राहणे (@अजिंक्याराहने 88) 21 ऑगस्ट, 2025
शार्दुल ठाकूरच्या नावाची चर्चा
शार्दुल ठाकूरला गेल्या वर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. याशिवाय शार्दुल ठाकूरला आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंटसकडून खेळण्याची संधी मिळाली होती. मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर, शिवम दुबे यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असताना शार्दुल ठाकूरचं नाव सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.