शरद पवारांनी अजितदादांकडे पुणे अन् पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी किती जागा मागितल्या?; जागावाटपाच
अजित पवार आणि शरद पवार पुणे-Pimpri Chinchwad महापालिका निवडणूक 2026: राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजल्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुण्यात बैठका, युती, जागावाटप, चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच पुण्याच्या राजकीय वर्तुळात दोन राष्ट्रवादी (NCP) एकत्र आल्यांनतर पहिली बैठक पार पडली. जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यातच आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. (Pune Municipal Election 2026)
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची महाविकास आघाडीत येण्याची मानसिकता आहे. पुण्यात आम्ही (शरद पवार गटाने) 30 ते 40 पेक्षा जास्त जागा मागितल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 25 ते 30 जागा मागितल्या आहेत, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत आहोत. संध्याकाळी 4 पर्यंत काँग्रेससोबत आमची चर्चा होईल. योग्य जागावाटप होणे अपेक्षित आहे. तरच महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ, असंही शशिकांत शिंदे म्हणाले. (Sharad Pawar And Ajit Pawar NCP)
पुणे महानगरपालिकेची सद्यस्थिती काय? (Pune Municipal Election)
41 प्रभागात एकूण 165 जागा आहेत. हे नगरसेवक थेट जनतेतून निवडून दिले जातात.
पुणे महानगरपालिकेचा 2017 निवडणूक निकाल- (पुणे महापालिका निवडणूक 2026)
भारतीय जनता पक्ष (भाजप)- 97
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)- ३९
काँग्रेस-9
शिवसेना- 10
मनसे- 2
एमिम- १
अपक्ष / इतर- 4
एकूण- 162
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची रचना- (Pimpri Chinchwad Municipal corporation)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य सभेत एकूण 128 नगरसेवक असतात. हे नगरसेवक थेट जनतेतून निवडून दिले जातात. महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महापालिका आयुक्त (IAS अधिकारी) असतो. स्थायी समिती, विषय समित्या आणि विविध विभागांद्वारे शहराचा कारभार चालवला जातो. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक मानले जात असले, तरी प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार आयुक्तांकडे असतात.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 2017 चा निकाल-
भाजप- 77
राष्ट्रवादी काँग्रेस- 36
शिवसेना-09
काँग्रेस – 00
मनसे- 01
अपक्ष – 05
एकूण- 128
शशिकांत शिंदे काय काय म्हणाले?, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.