एमआयडीसीकडून जमिनी घेऊन काम करणार नाही त्याला नोटीस देणार अन् जमिनी ताब्यात घेणार; अजित पवारांच

अजित पवार: एमआयडीसीकडून जमिनी घेऊन काम करणार नाही त्याला नोटीस देऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेणार आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. जळगाव (Jalgaon News) येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्ष प्रवेश मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणात म्हणाले की, 18 पगड जातींना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केले. त्यानुसार 26 वर्षांपूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत काम सुरू आहे. जाती-धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी प्रतिभा शिंदे या 25 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. पण सत्ता आल्यानंतर आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. कारण निर्णय आणि धोरण घेण्याची क्षमता असते. आम्ही कधी भेदभाव करत नाही, समविचाराने काम करतो.

जळगावमध्ये मोठी विमाने उतरण्याची व्यवस्था करणार

जळगाव, धुळे, नंदुरबार, गुजरातच्या काही भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम वाढणार आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की, तुम्ही निर्णय घेतला याबाबत कधी पश्चाताप होऊ देणार नाही. कलेक्टर, पालकमंत्री, इतर मंत्री सर्वांना घेऊन आम्ही बैठक घेतली. गोरगरीबांना घरं मिळतात का? वन जमीन, गायरान जागेचा लाभ मिळतो का? याबाबत माहिती घेतली. पुणे जिल्ह्यातील हिंजवडीला मोठ्या प्रमाणात आयटी इंडस्ट्री आली आहे. जळगावमध्ये मोठी विमाने उतरतील याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. त्यामुळे उद्योगपतींना आपल्याकडे येण्याची संधी मिळेल.

नोटीस देणार अन् जमिनी ताब्यात घेणार

आम्ही पायाभूत सुविधा देण्याची काम करतो आहे. आम्ही अनेक चढउतार बघितले आहेत. अर्थखाते आपल्याकडे आहे. त्यामुळे कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. इतक्या वर्षात एमआयडीसीकडून जमीन घेतली आणि काम करणार नाही त्यांना नोटीस देऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेणार आहोत, असा इशारा अजित पवारांनी दिला. तसेच जो तीन महिन्यांत उद्योग सुरू करेल त्याला आम्ही जमिनी देणार आहोत. उद्योगसाठी कमी दरात वीज देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

माणूसकी हीच आमची जात

अजित पवार पुढे म्हणाले की, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आता इथे सरपंचांनी प्रवेश केला आहे. आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू. जे विषय तुम्ही सांगितले आहे ते प्रश्न समजावून घेऊ. हिरामण खोसकर यांच्याकडे राज्याच्या आदिवासी सेलची जबाबदारी दिली आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जात आहोत. माणूसकी हीच आमची जात आहे. आमच्याकडे भेदभाव नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी आम्ही काम करतो. आपली विचारधारा एक आहे, असे  त्यांनी म्हटले.

प्रतिभा शिंदे यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही

आपली संघटित ताकद आपल्याला न्याय देऊ शकते. अल्पसंख्याक खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे आहे. अल्पसंख्याक सुद्धा भारतीय आहेत ही भावना जागरूक करायची आहे. काही गैरसमज आम्ही दूर करू. ज्यांना शंका असतील त्या दूर कराव्या लागतील. पण, आपण ही कायदा हातात घेऊ नका. अल्पसंख्याक समजाला आम्ही न्याय देऊ, असे देखील अजित पवार यांनी म्हटले. प्रतिभा शिंदे यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करून दाखवू. यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही सभा घेऊ. त्यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना देखील बोलावले जाईल, असे अजित पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=bzppf9jt-28

आणखी वाचा

Ajit Pawar : लाडकी बहीण योजनेनंतर एकनाथ शिंदे ‘लाडकी सुनबाई योजनेची’ घोषणा करणार? अजित पवार म्हणाले, आता कोणताही निर्णय…

आणखी वाचा

Comments are closed.