राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) पक्षाची धुरा नेमकं कोणाकडे जाणार यावरुन जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच, दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांची वेगवेगळी विधाने राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यातच, अजित पवारांच्या मृत्यूनंतर 4 थ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावरुन राजकीय चर्चा होत होता. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांकडून सुनेत्रा पवार यांचेच नाव घेतले जात आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या 15 दिवसांत होणार असल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अँड पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येते आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटीसाठी घेत आहेत. त्यातच,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून पार्थ पवार आणि जय पवार हेही पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पोहोचले आहेत. एकीकडे या भेटीची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पुढील 15 दिवसांत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या 15 दिवसात होणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याचीही माहिती आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक झाल्यानंतरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात पुढची चर्चा होईल, अशीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव

आणखी वाचा

Comments are closed.