धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजित दादा भडकले; एका शब्दात उत्तर देत म्हणाले.
पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून विरोधक व बीडमधील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा मागितला जात आहे. मात्र, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांना त्यांचं राजकारण लखलाभ असे म्हणत मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचंच त्यांनी सूचवलं आहे. तर जोपर्यंत पुरावा सापडत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या पूर्वीच घेतल्याची माहिती पुढे आली होती. अशातच आज पुण्यात पुन्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याबाबत प्रश्न विचारला असता अजित दादा काहीसे भडकले असल्याचे बघायला मिळाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकणात चौकशी सुरू केली असून एसआयटी, सीआयडी चौकशी करत आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल, असे ही सीएम म्हणताय. यात सगळ्या चौकशी सुरु आहेत. किंबहुना बीड प्रकरणाचे कोणीही दोष असतील त्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढेही होईल अशी प्रतिक्रिया देत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
रिंग रोड बाबत लवकरच निर्णय होईल- अजित पवार
लोकांनी वाहतूक शिस्त पाळली पाहिजे, यासाठी पाच हजार रुपये दंड करण्याचा विचार करत असून प्राथमिक चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मानसिकता आहे ते देशाचं काम बघत आहेत. टोल, ट्राफिक गर्दी हे टाळण्यासाठी बरेचसे टोल काढलेले आहेत. उड्डाणपूल किंवा इतर काय करता येईल का याच पण चर्चा सुरू आहे. रिंग रोड बाबत लवकरच निर्णय होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही बसून निर्णय घेऊ. सोबतच पुरंदर एअरपोर्ट बाबत बैठक झाली आहे. कुठलाही एखादा प्रकल्प करताना लोकांचा विचार करावा लागतो. पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करावं लागतं, त्या दिशेने काम सुरू असल्याची प्रतिक्रिया ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून दादांचा सल्ला
वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती दौऱ्यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले, आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. अलीकडे गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण, फोटो नाही काढू दिला, तर नाराजी होते अन् गडी बदलला, असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि पुढे वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी, असं म्हणत स्पष्ट शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती देण्याचं आवाहन केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.