उद्या ढगफुटी झाली तरी पुलाखालून पाणी पास झालं पाहिजे; अजित पवारांचा ऑन द स्पॉट आदेश
अजित पवार पाऊस सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन सीना नदीच्या पुराचे पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये घुसून मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी सकाळपासून करमाळा तालुक्यातील कोर्टी, संगोबा या गावांचा दौरा केला होता. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. मात्र, यावेळी एका व्यक्तीने अचानक वेगळाच विषय काढून अजित पवारांना थोड्यावेळासाठी बुचकाळ्यात टाकले. हा व्यक्ती त्याच्या भावाच्या खूनप्रकरणात (Murder Case) न्याय मिळावा, अशी मागणी घेऊन अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला. (Solapur Rain news)
अजित पवार कोर्टी गावात पुराच्या पाण्यामुळे कसे नुकसान झाले आहे, हे स्थानिकांकडून जाणून घेत होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याने एका खूनप्रकरणाची कहाणी अजित पवारांना सांगायला सुरुवात केली. हा व्यक्ती रडत होता. मात्र, अचानक आलेल्या या विषयामुळे अजित पवारही थोड्यावेळ संभ्रमात पडले. या व्यक्तीने अजित पवार यांना सांगितले की, माझ्या भावाने त्याच्या गरोदर पत्नीची हत्या केली आणि स्वत: गळफास लावून घेतला. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. याप्रकरणात योग्य तपास झाला पाहिजे आणि संबंधित महिलेवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या व्यक्तीने केली. त्यावर अजित पवारांनी तुझ्या भावाचे दुसऱ्या महिलेवर प्रेम होते, मग त्याने लग्न का केले, असा प्रश्न विचारला. त्यानंतर अजित पवार यांनी तेथील पोलीस उपायुक्तांना बोलावून याप्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली. यानंतर अजित पवार आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी निघून गेले.
Ajit Pawar: उद्या ढगफुटी झाली तरी पुलाखालून पाणी पास झालं पाहिजे, आपल्याला ते करायचं आहे; अजित पवारांचा ऑन द स्पॉट आदेश
अजित पवार यांनी बुधवारी सकाळी करमाळा तालुक्यातील संगोबा गावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी साचलेल्या पाण्यातून चालत जात शेतीची परिस्थिती पाहिली. संगोबा गावातील पुलावर अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. याबाबत गावकऱ्यांशी बोलल्यानंतर अजित पवार यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्याला फोन लावला. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, ‘तुमचा चीफ इंजिनिअर माझ्यासोबत आहे. मी आता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवर उभा आहे. याठिकाणी एक ब्रीज कम बंधारा आहे. हा पूल पाण्याखाली गेल्यावर गावाचा महत्त्वाच्या भागांशी संपर्क तुटतो. काल इकडे जवळपास आठ फूट पाणी होते, आताही आम्ही पाण्यातच उभे आहोत. काल 17 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. इथून पुढे 20 ते 25 हजार क्युसेक पाणी सोडलं तरी ते पास झालं पाहिजे, अशा पद्धतीने ब्रीज करुन हवा. हे काम कुठल्या फंडातून करायचं, ते मी ठरवतो. भूम परांडा आणि करमाळा असा दोन्ही बाजूच्या लोकांची ही मागणी आहे. त्यामुळे आता आपल्याला या ब्रीजचं काम करायचंच आहे. उद्या ढगफुटी झाली तरी येथील लोकांना त्रास होता कामा नये, अशी सूचना अजित पवार यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्याला केली.
https://www.youtube.com/watch?v=ZUWLXVXJ-OQ
आणखी वाचा
शेतकरी म्हणाले, दादा ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवार थांबवत म्हणाले, ‘एक मिनिट…’
आणखी वाचा
Comments are closed.