मी काय साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा मी कामे करुन देईल, अजित पवारांचं आश्वासन


अजित पवार : मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. माळेगाव मध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेले सगळं करणार, तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार असे अजित पवार म्हणाले. मागे झालं गेलं ते गंगेला मिळाले, आता नवी पहाट आहे. 1400 कोटीचे बजेट माझ्याकडे आहे. त्यातले तुम्हाला पैसे देईल. कुणीही संपत नसते, संकुचित विचार करू नका. मन थोडं मोठं ठेवा असे अजित पवार म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखानाचे करोडो रुपये वाचवले. कारखान्यात उशिरा पर्यत थांबलो. मी माझा घराचा डबा खाल्ला असे अजित पवार म्हणाले.

अर्थ खाते माझ्याकडे आहे. वाडपी तुमच्या समोर आहे, त्यामुळं तुम्हाला जास्त वाढणार

बारामतीत बाहेरुन हजरो कोटींचा निधी आणला आहे. अर्थ खाते माझ्याकडे आहे. वाडपी तुमच्या समोर आहे, त्यामुळे ओळखीचा असल्यावर तो तुम्हाला जास्त वाढतो असे वक्तव्य राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आपल्या हातात आहे आपण काहीही करु शकतो. काहीही म्हणजे चांगलं असे अजित पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या तावरे गटाने एकत्र येत स्थानिक आघाडी केली आहे.यानिमित्त आयोजीत केलेल्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते.

आम्ही सगळ्या जातीचा आदर करतो

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मी उभा राहणार नव्हतो. मी आणि पवार साहेब एकत्र असताना कधी आम्ही हारायचो. माझ्या स्वप्नात देखील नव्हतं की, मी चेअरमन होईल. मी उतरलो तर संपूर्ण ताकतीन असे अजित पवार म्हणाले.  उतरतो. बारामतीत 8 जागा बिनविरोध निवडून गेल्या आहेत. अजून थोडा रेटा लावला असता तर दहा जागांच्या पुढे आकडा गेला असता असे अजित पवार म्हणाले. माळेगाव नगरपंचायत साठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनमत आघाडी कडून सुयोग शामराव सातपुते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  तुमचं बजेट आहे 6 कोटीचे तुम्ही कितीही घास घास घासली तरी तुम्ही विकास करू शकत नाही. आपल्या हातात आहे आपण काहीही करू शकतो. काहीही म्हणजे चांगलं असे अजित पवार म्हणाले. आम्ही सगळ्या जातीचा आदर करतो. मानव ही आपली जात समजली पाहिजे.

आम्ही उंटावरून शेळ्या राखत नाही, बारामतीत जे केलं ते माळेगावमध्येही करेन

काहीनी बंड केलं आणि म्हणतात आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत. मग माझे कार्यकर्ते होतात तर बंडखोरी का केली? असा सवालही त्यांनी केला. आता आमच्या विरोधात उभे राहिले आणि निवडून आले, नंतर वरून निधी नाही मिळाला तर काय करणार? ते म्हणणार की आम्हाला निधी मिळाला नाही वरून, मग निधी मिळत नाही तर उभा कशाला राहिला? मी बारामतीत करतोय ते इथे पण करेल, फक्त तुम्ही साथ द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले. मी इथे झाड लावलं, आणि कुणी नेलं उपटून तर मी काय करणार? पाणी समजा कुणी घातलं नाही तर मी मुंबईतून येणार का पाणी घालायला? असा सवाल अजित पवार यांनी केला.
येताना डिव्हायडर मधले दगड निघाले होते अधिकाऱ्यांना सांगितले ते बसवून घ्या, आम्ही उंटावरून शेळ्या राखत नाही. असेही अजित पवार म्हणाले.

चुकणारा माझ्या जवळचा असला तरी पोलिसांना सांगेल

जर कुणी चुकला, तर तो माझ्या जवळचा असला तरी पोलिसांना सांगेल. चुकलं कुणी तर त्यांना बेड्या घालणार आणि त्यांची रस्त्यात वरात काढणार असेही अजित पवार म्हणाले. परवा एक घटना घडली ती मला आवडली नाही. एका पक्षच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली ती मला पटली नाही. पोलिसांना सांगितले ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई करा.

महत्वाच्या बातम्या:

राज्यातील खेळाची मैदानं अद्ययावत करा, नवं क्रीडा धोरण तयार करा; अजित पवारांचे मंत्रालयातून निर्देश

आणखी वाचा

Comments are closed.