Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकावरुन जय पवार-पार्थ पवारांमध्ये मतभिन्नता, नेमकं काय
अजित पवार स्मारक: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांचे स्मारक उभारण्याची चर्चा सुरु झाली होती. काही दिवसांपूर्वीच विद्या प्रतिष्ठानमध्ये या विषयाबाबत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार (Jay Pawar) यांची एक बैठक पार पडली होती. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता अजित पवार यांच्या स्मारकाबाबत पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार या दोघांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांचं स्मारक किंवा संग्रहालय कुठे उभारायचे यावरुन जय पवार आणि पार्थ पवार यांची वेगळी मतं आहेत. (Maharashtra Politics News)
जय पवार यांचा अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करा आणि स्मारक बारामतीत असावं असा आग्रह आहेत. तर पार्थ पवार यांच्याकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. पार्थ पवार हे अजित पवारांचे संग्रहालय आणि स्मारक हे दोन्ही एकाच ठिकाणी म्हणजे बारामतीत उभारण्याबाबत ठाम आहेत.
परंतु, अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि पुणे शहर यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे अजित पवार यांचे संग्रहालय पुणे शहरात असावे, असे जय पवार यांचे म्हणणे आहे. मंगळवारी जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडत आपली इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे आता सुनेत्रा पवार आणि इतर पवार कुटुंबीय याबाबत काय निर्णय घेणार, हे बघावे लागेल.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची उद्या पुण्यात बैठक
उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे यात 2026- 27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे. जानेवारीत अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागाकडून विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरू होते
Sunetra Pawar meets पीएम मोदी: सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदींना भेटणार
उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राज्यसभा खासदार म्हणून त्या आपला राजीनामा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील सोबत असणार आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.