अजित दादांच्या राष्ट्रवादीचं ही ठरलं! विधानपरिषदेसाठी विदर्भातील ‘या’ बड्या नेत्याला संधी

विद्रन परिषद निवडणूक 2025: भाजप, एकनाथ शिंदेंच्या (मराठी) शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar)  गटानेही आपला उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. महायुतीचा (Mahayuti Allaince) घटक पक्ष असलेल्या अजित दादांच्या पक्षाने संजय खोडके (Sanjay Khodke) यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहे. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिक्त झालेल्या  विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2025) येत्या 27 तारखेला होणार आहे. अशातच आज (सोमवार 17 मार्च) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे. परिणामी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला तीन तर घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे आता महायुतीचे पाच ही उमेदवार ठरले असून आज हे पाच ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर

विधानसभा निवडणुकीनंतररिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुती सरकारमध्ये तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहे. या तीन जागांसाठी भाजपकडून नेहमी प्रमाणे सर्व प्रथम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एक जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रकांत रघुवंशी हे धुळे -नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य असून त्यांना पक्षाने संधी दिली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपला उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवत संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहे.

विधानपरिषदेत महायुतीतील पक्षीय बलाबल

भाजप
1) दादाराव केचे
२) संजय केनेकर
3) संदीप जोशी

शिवसेना
1) चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी

1)संजय खोडके

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.