युती सरकारने पार्टी फंडसाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले; सिंचन घोटाळ्यावरुन अजितदादां
सिंचन घोटाळ्यावर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरुन (Sinchan Scam) भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना घेरत आलंय. आज त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरुन पलटवार केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.
या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपकडे होतं. दरम्यान 1999 ला मी अर्थमंत्री होतो, त्या कालखंडात अशा स्वरूपाचा निर्णय झालेला मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली. तसंच 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली§ असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.
अजित पवारांचा नेमका आरोप काय? (सिंचन घोटाळ्यावर अजित पवार)
अजित पवारांनी भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. 1999 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच त्या अधिकाऱ्याने कबुल केलं. पुढे त्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की, 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
अजित पवारांना ‘एबीपी माझा’चे सवाल- (सिंचन घोटाळ्यावर अजित पवार)
अजित पवारांनी हे प्रकरण 27 वर्षे लपवून का ठेवले?
ज्या अधिकाऱ्याने ही बाब बोलून दाखवली त्याचे नाव अजित पवार का सांगत नाहीत?
अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यावर मंत्री म्हणून कारवाई का केली नाही?
अजित पवारांनी ही बाब आत्ताच का उघडकीस आणली?
‘माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब समोर आल्यास आवश्यक असेल ते खेरीज करीन’ अशी मंत्री म्हणून शपथ घेतली असताना हा घोटाळा का लपवला?
संबंधित बातमी:
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
आणखी वाचा
Comments are closed.