पुणे जमीन घोटाळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानीबद्दल लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा, हवालाचे पैसे घ
अजित पवार आणि पार्थ पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार जमीन खरेदी (Parth Pawar Land) प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी सहजिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर जमीन घोटाळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी खळबळजनक दावा केलाय.
लक्ष्मण हाके म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आंदोलन करू. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, ही आमची मागणी आहे, असे त्यांनी म्हटले.
लक्ष्मण हाके एक शीतल तेजवान्नी: शीतल-तळव्याचा खालजानक दावा
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, शितल तेजवानी परदेशात पळाली ती कशी पळाली? हवाल्याचे पैसे तिला देण्यात आले आहेत, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला. अजित पवार यांच्याकडे एक गुड बुक आणि स्लॅम बुक आहे. त्यांच्याकडे अधिकाऱ्यांची एक फळी आहे जी अशी कामे करते. अनेक जमिनीत अजित पवार यांनी गैरव्यहार केला आहे, असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलाय.
Laxman Hake on Parth Pawar Land Scam: लक्ष्मण हाकेंचा पार्थ पवारांवर निशाणा
दरम्यान, लक्ष्मण हाकेंनी फेसबुकवर पोस्ट लिहूनही अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. 1800 कोटींची महार वतनाची जागा 300 कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले, बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली असं म्हणत त्यांनी अजित पवारांसह पार्थ पवारांवर टीका केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.